महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा बनावटीची लाखाची दारू जप्त; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

11:34 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवकाळात शहरात विक्रीसाठी आणलेली गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक कार व एक अॅक्टिव्हा अशी दोन वाहने अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. यासंबंधी सुभाष सुधीर डे याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याजवळून एकूण अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. अबकारी विभागाचे विजयकुमार हिरेमठ, रवी मुरगोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. जुन्या पी. बी. रोडवरील ओव्हरब्रिजखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीए 07 के 2046 क्रमांकाची इंडिका कार व केए 22 ईएल 9524 क्रमांकाची अॅक्टिव्हा, 750 मिलीच्या गोवा बनावटीच्या 87 दारूच्या बाटल्या असा एकूण एक लाख रुपये किमतीचा दारूसाठा व दीड लाख रुपयांची वाहने जप्त केली आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article