For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देणारे गोवा दुसरे राज्य

11:32 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देणारे गोवा दुसरे राज्य
Advertisement

पणजी : अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांना चांगले वेतन देणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य आहे, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली आहे. तामिळनाडू पहिले राज्य असून तेथे अंगणवाडी कर्मचारी, मदतनीसांना सर्वाधिक वेतन मिळते, असेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे. तामीळनाडूत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रु. 3200 ते 19700 या दरम्यान वेतन मिळते. अनुभव व अनेक वर्षांची सेवा या हिशेबाने ते वेतन वाढते. गोव्यात रु. 5500 ते 13500 असे वेतन मिळते. मदतनीसांना रु. 3750 ते रु. 6750 एवढे वेतन मिळते, अशी माहिती इराणी यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.