रस्त्यांची स्थिती अन् वाहतूक कोंडीने गोमंतकीय जराजर्जर..!
सध्या गोव्यातील रस्त्यांची खराब अवस्था पाहता, पायाभूत सुविधांमध्ये अव्वल म्हणवून शेखी मिरविणाऱ्या राज्य सरकारला हे नक्कीच शोभादायक नाही. रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता ‘न पाहावे डोळा’, असेच म्हणावे लागेल. रस्ता दुरुस्तीबाबत गोवा सरकारने गंभीर होणे आवश्यक आहे. अन्यथा येणारे पर्यटक नक्कीच या खराब रस्त्यांबाबत गोव्याच्या वाईट प्रतिमेचे दर्शन सर्वदूर सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करू शकतात. त्यामुळे पर्यटनावरही विपरित परिणाम होऊ शकतो.
गोव्यात सध्या पावसाने बऱ्यापैकी फलंदाजी केल्यामुळे साहजिकच रस्ते ख•sमय झाले आहेत. याचे खापर केवळ पावसावरच न फोडता, रस्त्यांच्या सुमार बांधकामामुळेही अशी परिस्थिती उद्भवणे साहजिक आहे. याला गोवा सरकारबरोबरच सर्व संबंधित घटक जबाबदार आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल.
काही भागात कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांचे दुरुस्तीकरण संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध हरमल भागातील धोकादायक ख•s वाहनचालकांना, पर्यटकांना मन:स्ताप देणारे होते. यामुळे आपला गाव स्वच्छ, सुरक्षित व सुविधांनीयुक्त करण्यासाठी तसेच संबंधित खात्याच्या बेजबाबदारपणामुळे कोणाचा बळी जाऊ नये म्हणून स्थानिक युनायटेड क्लबने पुढाकार घेऊन रस्त्यावरील काही ठिकाणचे ख•s बुजविण्याचे समाजोपयोगी कार्य राबविले. यासाठी या क्लबचे अभिनंदन करावे लागेल. संबंधित यंत्रणेच्या रस्ता दुरुस्तीच्या चालढकलपणामुळे अन्य संस्थांनीही या युनायटेड क्लबचा आदर्श नजरेसमोर ठेवून रस्ता दुरुस्तीसंबंधी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.
गोव्यात मोठ-मोठे महोत्सव राज्य सरकार भरवत असते. त्याचबरोबर मंत्री, आमदारही आपापल्या मतदारसंघात महोत्सव आयोजित करीत असतात मात्र पायाभूत साधन-सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे खेदाने म्हणावे लागेल. आज गोव्याचा विचार करता राजधानी पणजीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातल्या त्यात पर्वरी ते पणजी गोव्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या महामार्गावर उ•ाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने साहजिकच या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तसेच रस्त्यावर पडलेल्या ख•dयांमुळे वाहनचालक त्रस्त बनले आहेत. म्हापसाहून पर्वरीमार्गे पणजीला येणाऱ्या अवजड, हलकी आणि दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने साहजिकच वाहतूक कोंडी ही जणू ‘पाचवीलाच पूजली’ आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम जवळ येऊन ठेपल्याने समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्स व्यावसायिक तयारीला लागलेले आहेत. शॅक्स व्यवसायात मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे किनाऱ्यावरील मूलभूत सुविधा पुरविण्याकडे गोवा सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किनारपट्टीकडे येणारे रस्ते त्वरित सुधारावेत, अशी त्यांची मागणी आहे. पर्यटक पाठ फिरविल्यास आमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर होते. अनेक लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. अनेक रस्त्यांवरून प्रवास केला. या दरम्यान, राज्यातील रस्त्यांची वाताहत झाल्याचे त्यांना दृष्टीस पडले. राज्यातील रस्ते हे जीवघेणे आहेत. डांबरीकरण केलेले रस्ते जर तीन महिन्यांत खराब होत असतील तर यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. हा भ्रष्टाचार थांबवून जनतेला चांगले ख•sविरहित रस्ते भाजप सरकारने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निकृष्ट रस्त्यामुळे सध्या गोव्यात आप पक्षातर्फे ‘बुराक मोहीम’ आखण्यात आली आहे. या अनुषंगाने एक रॅलीही काढण्यात आली. तसेच सह्यांच्या मोहिमेंतर्गत नागरिकांच्या निवेदनाचे गठ्ठे ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. राज्यातील खराब रस्त्यांबाबत आता यापुढे होणाऱ्या प्रत्येक रस्ता दुऊस्तीकरणावरही ‘आप’ लक्ष ठेवणार आहे. कंत्राटदारांवर वचक राहावा म्हणून ‘आप’चे कार्यकर्ते हे काम हाती घेणार असून हलगर्जीपणा कोणत्याही प्रकारे सहन केला जाणार नाही, असा निर्धार ‘आप’ने व्यक्त केला आहे.
ख•dयांमुळे अपघात होत आहेत. तसेच अनेक लोकांचा जीव गेल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मान्य करतात. परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे का होत आहे, याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आज रस्ता कामात भ्रष्टाचार वाढलेला आहे व तो ख•dयांच्या माध्यमातून उघडपणे दिसून येत आहे. यावर अंकुश ठेवायचा असेल तर गोमंतकीयांनी आवाज उठविण्याची गरज आहे.
‘आप’ने रस्त्यावरील ख•dयांबाबत व्यक्त केलेली चिंता रास्त असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केले आहे. येत्या 15 दिवसांत राज्य ख•sमुक्त करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. एकूणच गोव्यात ख•sमय रस्ते आणि महत्त्वपूर्ण मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गोमंतकीय जराजर्जर बनलेला आहे. यावर त्वरित उपाययोजना आखणे आवश्यक ठरते. एकीकडे गोवा वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असताना ‘फॉर्म्युला फोर’ रेससारखा क्रीडा प्रकार बोगदा-वास्को येथील रस्त्यांवर बेकायदेशीररित्या आयोजित करण्याचा घाट घातला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गैरसोय होणार होती. तसेच ध्वनिप्रदूषण होणार असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला होता. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा अन् दुसरीकडे सुमारे 52 कोटी खर्चून अशाप्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करणे म्हणजे गोमंतकीयांची जणू थट्टाच होती. हा खर्च साधनसुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणा, अशी विरोधकांची जोरदार मागणी होती. जनतेचा विरोध लक्षात घेऊन ‘फॉर्म्युला फोर’चे आयोजन रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याने नागरिकांना दिलासा लाभला.
एकंदरित गोवा पर्यटनदृष्ट्या अधिक सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी महोत्सवांवर अधिक निधी खर्च करण्यापेक्षा रस्ते तसेच अन्य सुविधांवर कामी आणून पर्यटक तसेच समस्त गोमंतकीयांना कुठलाही त्रास पडू नये, गैरसोय होऊ नये, याकडे गोवा सरकारने कटाक्ष बाळगावा, असे आगामी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सूचवावेसे वाटते.
राजेश परब