कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विविधता नांदत असल्यानेच गोवा ठरतोय वेगळा : खंवटे

08:16 AM Sep 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक पर्यटनदिनानिमित्त अनेकांचा सन्मान, विविध कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

आजचा दिवस हा कृतज्ञतेचा आणि उत्सवाचा आहे. हा दिवस त्या उद्योजकांचा, चालकांचा, मच्छीमारांचा, लाईफगार्ड्सचा आणि या उद्योगाला बळ देणाऱ्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचा सन्मानाचा आहे. पर्यटन हे केवळ खाते किंवा उद्योग यांच्यामुळे चालत नाही तर ती एक स्थानिक समुदायांसह संपूर्ण परिसंस्था आहे. गोव्याची पर्यटनकथा केवळ हॉटेल्सपुरती मर्यादित नाही, तर आमच्या स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचली आहे. आमचे जेवण-खाण हे भूतकाळ आणि भविष्य यांना जोडणारा दुवा आहे. भारताची कलिनरी कॅपिटल म्हणून गोव्याची खाद्यसंस्कृती ही संस्कृतीची ओळख करून देणारी ठरत आहे. राज्यात विविधता नांदत असल्यामुळेच गोवा वेगळा ठरतो, असे उद्गार पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काढले.

पर्यटन विभाग, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा व स्काल

इंटरनॅशनल गोवा यांच्या सहकार्याने आयोजित ‘जागतिक पर्यटन दिन 2025’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक  केदार नाईक, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा, स्काल

इंटरनॅशनलचे अध्यक्ष  विवेक केरकर, जीसीसीआय अध्यक्षा प्रतिमा धोंड, टीटीएजी उपाध्यक्ष (दक्षिण)  विनय अल्बुकर्क, टीटीएजी उपाध्यक्ष (उत्तर)  आकाश मडगावकर, उपसंचालक  दिशा तारी, हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, समुदाय-आधारित पर्यटन उद्योजक, शाश्वततेसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, विविध मान्यवरांच्या करण्यात आलेल्या  सन्मानांद्वारे आपण केवळ वैयक्तिक यशच साजरे करत नाही, तर गोव्याच्या पर्यटनाला पुढे नेणाऱ्या सामूहिक भावनेचाही गौरव करत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांची जिद्द, व्यावसायिकांची निष्ठा किंवा प्रभावकांची सर्जनशीलता, प्रत्येक योगदान गोव्याचे पर्यटन अधिक सर्वसमावेशक, शाश्वत आणि पुनऊत्थानशील बनवते, असेही ते म्हणाले.

पर्यटनदिनी सन्मानित व्यक्ती अशा :

1) ‘विन्सेंट रामोस शिष्यवृत्ती’चे वितरण राज्यातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यापैकी मॅकेंझी वास, कॅटलिन रोझॅन मस्करेन्हास यांचा समावेश होता. या दोघांनाही दिवंगत विन्सेंट रामोस यांच्या पत्नी डीना रामोस यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली.

2) गोवा पर्यटनासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल श्री. पेले आणि पराग रागणेकर यांचा सन्मान करण्यात आला, तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणून कामगिरीबद्दल श्रीमती स्कार्लेट एम. रोज आणि मोझेस जे. सल्दान्हा यांना गौरविण्यात आले.

3) विशेष पारितोषिकांमध्ये श्रुष्टी सुदिन प्रभुदेसाई, आशरफी शेटदेसाई गायकवाड आणि विराज फडते यांना विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले.

4) युवा टुरिझम क्लब्समधील यशस्वी कामगिरीबद्दल शैल सावकार (शिरोडा काकुलो कॉलेज, लिसा डायस (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट गोवा) आणि डॉ. किरण गवडे (पी. ई. एस. रवी एस. नाईक कॉलेज, फर्मागुढी) यांना सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article