For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘प्रवाह’च्या बैठकीत गोव्याच्या पदरी निराशाच

01:02 PM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘प्रवाह’च्या बैठकीत गोव्याच्या पदरी निराशाच
Advertisement

म्हादईची पाहणी, लघू धरणांना कर्नाटकचा आक्षेप

Advertisement

पणजी : म्हादई पात्राची पाहणी करण्याची गोव्याची मागणी ‘प्रवाह’च्या बैठकीत मांडण्यात आली खरी परंतु कर्नाटककडून त्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे सदर मागणीला यश आले नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.गोव्यातर्फे काही लघू धरणे बांधण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आणि त्याचे प्रस्तावही देण्यात आले. त्यालाही कर्नाटकने विरोध केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘प्रवाह’च्या बैठकीतून गोव्याच्या बाजूने सकारात्मक असे काहीच निष्पन्न झाले नसल्याचे समोर आले आहे . महाराष्ट्राच्या विर्डी येथील धरणास या बैठकीत गोव्याने पाठिंबा दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हादई पाणी वाटपावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रवाह’ची स्थापना केली परंतु हा प्रश्न सुटलेला नाही. ‘प्रवाह’च्या बैठकीतून देखील काहीही साध्य झाल्याचे दिसत नाही. कर्नाटकने तर फक्त आक्षेप घेण्याचे आणि विरोध करण्याचेच तंत्र चालू ठेवल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ‘प्रवाह’च्या बैठकीत गोव्याची बाजू वरचढ असल्याचे दिसून येत नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.