महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजीराजे हायस्कूलमध्ये गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा

11:46 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाटंबार्से : खोलपेवाडी साळ येथील शिवाजीराजे विद्या संकुलात 63 वा गोवा मुक्तीदिन विविध कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक नागनाथ गोसावी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थी गीतीका सावंत, वेदिका नाईक, दत्ताराम बांदेकर, संयम गवस, गौरव देसाई आदींनी स्वागत गीत सादर केले. त्यांना संगीत शिक्षक सुविशांत बोर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनी राधिका गवस व मानसी नाईक यांनी गोवा मुक्तीदिना बद्दल आपले विचार प्रकट केले. मुख्याध्यापक गोसावी यांनी आपल्या भाषणात  विद्यार्थ्यांनी शिस्तीला प्राधान्य दिले पाहिजे. शिस्त अंगीकारली तर सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे नाट्या प्रशिक्षक ज्ञानेश्वर पार्सेकर लिखित व दिग्दर्शित नाटक ‘वैयक्तिक सुरक्षा’ व ‘नाडा सवाय ना’ विद्यार्थ्यांनी सादर केले. यात अनिशा परब, संतोषी नाईक, ऊची सावंत, मिताली गवस, निकिता गवस, श्रेया परब व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’यावर श्रीया कुबडे, जानवी परब, दिव्या गवस व इतर या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले.

Advertisement

त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : छत्री रंगवणे (कनिष्ठ गट - इयत्ता पाचवी ते सातवी) : प्रथम - समृद्धी जाधव, दीपराज राऊळ, द्वितीय - श्रेयस सावंत व वैभव गावणे, तृतीय क्रमांक - आरव नाईक व नम्रता राजपुरोहित. वरिष्ठ गट (इयत्ता आठवी ते दहावी) : प्रथम - नेहा च्यारी, वेदिका परब, सारिका राजपुरोहित, ओम देसाई, द्वितीय - मिताली गवस, अर्पिता नाईक, प्रतिज्ञा नाईक, दुर्वा पाटील, तृतीय - ऊची सावंत, पुनम टूडू, लोचन मांद्रेकर, निशिता दळवी. विजेत्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ गोसावी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिक्षक दिलीप देसाई, नितीन नाईक, शिक्षिका सुकन्या केणी, शिक्षिका सोनल परब आधी उपस्थित होते. शिक्षक ऊद्रेश नाईक, दिलीप देसाई, शिक्षिका सोनल परब व अपूर्वा गाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिरव्या गटाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर शिक्षक नितीन नाईक व सचिन राऊत यांनी व्यवस्थापन केले होते. विद्यार्थिनी वेदिका परब हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सारिका राजपुरोहित हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article