कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असंसर्गजन्य आजारांना तोंड देण्यास ‘गोवा केअर्स 2025’ अभ्यास गट

01:12 PM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : टाटा, ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार

Advertisement

पणजी : गोव्यातील असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या समस्यांना तोंड देण्यासाठी ‘गोवा केअर्स 2025’ नावाचा अभ्यास गट सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड या आजारांबाबत टाटा मेमोरियल हॉस्पिटल व ऑक्सफर्ड विद्यपीठाच्या मदतीने संशोधन केले जाईल. राज्यातील 1 लाख लोकांची तपासणी करून संशोधन केले जाईल. या संशोधनामुळे आरोग्य धोरण आखण्यास तसेच निधीची तरतूद करण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा संचालनालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या पुढाकाराने असंसर्गजन्य गट अभ्यासावरील बैठक काल मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. या बैठकीत टाटा मेमोरिएलचे डॉ. राजेश दीक्षित, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर, मुख्य सचिव व्ही. कंदवेलू, डॉ. शेखर साळकर, डॉ. गिता काकोडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सामंजस्य करार झाला  असून त्यांच्या सहकार्याने हा अभ्यास राज्यातील दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या जीवनशैली, पर्यावरण आणि अनुवांशिक घटकांचे परीक्षण करेल. सार्वजनिक आरोग्य वाढविण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल असे ते म्हणाले.

Advertisement

गर्भाशय, स्तन कर्करोगाची तपासणी 

या संशोधनातून गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाची देखील तपासणी केली जाईल. या उपक्रमाची योजना रक्त नमुन्यांचे विश्लेषण करणे, बायोकेमिस्ट्री मूल्यांकन करणे, अशी आहे. मूत्रपिंड समस्या किंवा लिपिड असामान्यता यासारख्या दीर्घकालीन आजारांची सुऊवातीची लक्षणे शोधू शकतो आणि वेळेवर तपासणी करण्याची शिफारस करू शकतो, असे डॉ. दीक्षित म्हणाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, खाण्याच्या सवयी तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे गोव्यात तऊण, तऊणींमध्येही हृदयरोगाचे आजार दिसून येतात. या संशोधनामुळे बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकणार असून त्यामुळे पुढील योजना करता येतील, असे सांगून त्यांनी हृदयाशी संबंधित आजार असलेल्या तऊण ऊग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article