महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अयोध्येत ‘गोवा भवन’ उभारणार

10:38 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : गोव्यातील दोन हजार भक्तांसह घेतले दर्शन

Advertisement

पणजी : अयोध्येत गोवा भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारतर्फे गोवा सरकारला त्यासाठी जमीन प्रदान करण्यात येणार आहे. ती जमीन मिळाली की तेथे गोवा भवन साकाऊ, अशी माहिती डॉ. सावंत यांनी अयोध्येतून दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्नी सुलक्षणा यांच्यासह अयोध्येत श्रीराम मंदिरास भेट दिली. रामलल्लाचे दर्शन घेऊन तेथे गोमंतकीय जनतेच्या भल्यासाठी प्रार्थना केली. गोव्यातील भक्तगणांची अयोध्येत निवास व्यवस्था व्हावी या हेतूने गोवा भवन तेथे बांधण्याची योजना आहे. नवी दिल्लीत गोवा सदन आहे तर मुंबईत गोवा भवन आहे. त्याच धर्तीवर हा अयोध्येतील गोवा भवन प्रकल्प राबविण्याचा विचार डॉ. सावंत यांनी अयोध्या भेटीत बोलून दाखवला. गोव्यातील सुमारे 2000 पेक्षा अधिक रामभक्त अयोध्येत राममंदिर व रामलल्लाच्या दर्शनार्थ आले असून ते केवळ राममंदिर नाही तर राष्ट्र मंदिर असल्याचा दावाही डॉ. सावंत यांनी केला आहे.

Advertisement

गोव्यातील मंत्री, आमदार, भाजप पदाधिकारी तसेच इतर काही मान्यवर मंडळी राममंदिराच्या दर्शनास अयोध्येत पोहोचले असून त्या सर्वांनी तेथे भेट दिली. उत्तर प्रदेश सरकारने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी योग्य व्यवस्था केली असून गोवा सरकारतर्फे मुख्यमंत्री देवदर्शन योजनेत अयोध्येचा समावेश करण्यात येणार आहे. गोव्यातून जे भक्तगण अयोध्येत जातील त्यांची एप्रिलनंतर आम्ही पुरेशी व्यवस्था करणार आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागा दिली तर अयोध्येत गोवा भवन बांधण्यात येईल. त्यामुळे गोव्यातून येणाऱ्यांची चांगली सोय होणार असल्याची खात्री डॉ. सावंत यांनी वर्तवली. अयोध्येसाठी राज्य सरकारतर्फे खास ‘आस्था’ रेल्वे सोडण्यात आली आणि रामभक्तांची सोय करण्यात आली. त्यांनी श्रीरामाचा गजर करीत, भजने म्हणत, घोषणा देत प्रवास केल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article