गो गो स्पोर्ट्स,साईराज वॉरियर्स पुढील फेरीत
साईराज चषक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा : सूर्या, ओमकार, मनोज सामनावीर
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून के. आर. शेट्टी किंग्ज् संघाने कांतारा बॉईजचा, गो गो स्पोर्ट्सने विघ्नहर्ताचा, साईराज वॉरियर्सने आदर्श इलेव्हनचा तर गो गो स्पोर्ट्सने के. आर. शेट्टी किंग्जचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. सूर्या गावकर, ओमकार तावडे, मनोज होसमनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 110 धावा केल्या. रजतने 1 षटकार 5 चौकारांसह 33, सूर्या गावकरने 3 षटकारांसह 24, मदनने 2 षटकारांसह 17 धावा केल्या. कांतारा बॉईजतर्फे प्रणित व श्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर कांतारा बॉईजने 8 षटकात 7 गडी बाद 31 धावा केल्या. त्यात प्रसन्नाने 10 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे साहिलने 2 तर सूर्याने 1 गडी बाद केले.
आजचे सामने
- पांडुरंग सी. सी. नागरमुन्नोळी वि. ब्रदर्स इलेव्हन सकाळी 9 वा.
- एसआरएस हिंदुस्तान वि. एवायसी सकाळी 11 वा.
- पहिल्या सामन्यातील विजेता वि. साईराज वॉरियर्स दुपारी 1 वा.
- चौथा सामना दुसऱ्या सामन्यातील विजेता वि. डेपो मास्टर्स यांच्यात सायं. 4 वा.