गो गो स्पोर्ट्स,साईराज वॉरियर्स पुढील फेरीत
साईराज चषक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा : सूर्या, ओमकार, मनोज सामनावीर
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून के. आर. शेट्टी किंग्ज् संघाने कांतारा बॉईजचा, गो गो स्पोर्ट्सने विघ्नहर्ताचा, साईराज वॉरियर्सने आदर्श इलेव्हनचा तर गो गो स्पोर्ट्सने के. आर. शेट्टी किंग्जचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. सूर्या गावकर, ओमकार तावडे, मनोज होसमनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 110 धावा केल्या. रजतने 1 षटकार 5 चौकारांसह 33, सूर्या गावकरने 3 षटकारांसह 24, मदनने 2 षटकारांसह 17 धावा केल्या. कांतारा बॉईजतर्फे प्रणित व श्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर कांतारा बॉईजने 8 षटकात 7 गडी बाद 31 धावा केल्या. त्यात प्रसन्नाने 10 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे साहिलने 2 तर सूर्याने 1 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 57 धावा केल्या. त्यात दर्पनने 2 षटकारांसह 22 धावा केल्या. गो गो स्पोर्ट्सतर्फे ओमदार तावडे 10 धावात 4 तर रवीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गो गो स्पोर्ट्सने 6.2 षटकात 5 गडी बाद 61 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 112 धावा केल्या. मनोज होसमनीने 5 षटकार व 3 चौकारांसह 20 चेंडून नाबाद 51, आनंदने 2 षटकार, 3 चौकारांसह 33 धावा केल्या. आदर्शतर्फे मारुती व विनायक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर आदर्शने 8 षटकांत 5 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात भुजंगने 10 तर महेशने 11 धावा केल्या. साईराजतर्फे आकाश, मनोज, कपिलेश व करण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 41 धावा केल्या. त्यात रजतने 18 धावा केल्या. गो गो स्पोर्ट्सतर्फे ओमकार तावडेने 11 धावात 3 तर फजलने 3 गडी बाद केले. त्यानंतर गो गो स्पोर्ट्सने 3.1 षटकात बिनबाद 44 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला. साहिलने 2 षटकार 4 चौकारांसह नाबाद 32 अमितने नाबाद 11 धावा केल्या.
आजचे सामने
- पांडुरंग सी. सी. नागरमुन्नोळी वि. ब्रदर्स इलेव्हन सकाळी 9 वा.
- एसआरएस हिंदुस्तान वि. एवायसी सकाळी 11 वा.
- पहिल्या सामन्यातील विजेता वि. साईराज वॉरियर्स दुपारी 1 वा.
- चौथा सामना दुसऱ्या सामन्यातील विजेता वि. डेपो मास्टर्स यांच्यात सायं. 4 वा.