For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरोघरी जावून मतदार चिठ्ठ्या द्या

10:24 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरोघरी जावून मतदार चिठ्ठ्या द्या
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : मतदारांना आपल्या मतदान केंद्राबाबतची माहिती मतदानापूर्वी मिळावी, यामुळे मतदान करण्यास मतदारांना सोयीचे ठरणार आहे. यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती असणाऱ्या चिठ्ठ्या देण्यात याव्यात, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मतदानाची तारीख जवळ येत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्वरित घरोघरी जावून मतदारांना मतदान केंद्राची माहिती  असणाऱ्या चिठ्ठ्या देण्यात याव्यात. मतदान जागृतीसाठी स्वीप समितीकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याला पूरक म्हणून बीएलओंनी घरोघरी जावून या चिठ्ठ्यांचे वाटप करावे. यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, विशेष जिल्हाधिकारी गीता कौलगी उपस्थित होते. यांसह साहाय्यक निवडणूक अधिकारी पी. एन. लोकेश, राजेश्री जैनापूर, डॉ. राजीव कुलेर, बलराम चव्हाण, प्रभावती फकिरपूर, सतीशकुमार, शकिलअहम्मद व तहसीलदार उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.