महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादाविरोधात वैश्विक एकजूट हवी

06:55 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ब्रिक्स’ परिषदेत प्रतिपादन, जगाच्या अर्थव्यवस्थेत ब्रिक्स अग्रगण्य

Advertisement

वृत्तसंस्था / कझान (रशिया)

Advertisement

कोणतेही कारण अगर निमित्त न सांगता, दहशतवादाविरोधात प्रत्येक देशाने एकमताने आणि एकजुटीने अभियान चालविणे अत्यावश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या कझान येथे ‘ब्रिक्स’च्या परिषदेत केले आहे. त्यासमवेत त्यांनी ब्रिक्सच्या आर्थिक प्राबल्यावरही प्रकाश टाकून जगाच्या अर्थव्यवस्थेत या संघटनेचे महत्व आपल्या भाषणात विशद केले.

या परिषदेला भारतासह चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि ब्राझील या देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. या परिषदेचे आयोजन रशियाच्या कझान या शहरात करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रथम परिषदेला उपस्थित सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.

दहशतवादाला थारा नको

दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे संकट असून त्याला कोणत्याही देशाने कोणत्याही कारणास्तव थारा देता कामा नये. सर्व देशांनी एकत्रिपणे या संकटाशी दोन हात करुन ते संपविण्याची आवश्यकता आहे. तसेच दोन देशांमधील समस्यांवर युद्ध नव्हे, तर शांततामय चर्चा हाच तोडगा असू शकतो. त्यामुळे याच मार्गाचा अवलंब केल्यास तो लाभदायक असतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रचंड अर्थव्यवस्था

ब्रिक्स या संघटनेचा विस्तार करण्यात आला असून आता ही संघटना जगातील एक अग्रगण्य अर्थव्यवस्था बनली आहे. ब्रिक्स देशांची एकत्रित उलाढाल 30 लाख कोटी डॉलर्स इतकी प्रचंड आहे. ब्रिक्स व्यापार मंडळ आणि ब्रिक्स महिला उद्योग युती या दोन्ही संस्थांचा या अर्थव्यवस्थेत मोलाचा सहभाग आहे. ब्रिक्सची बँक दक्षिण गोलार्धातील देशांसाठी एक वरदान ठरली आहे. गुजरातच्या आंतरराष्ट्रीय वित्त-तंत्रज्ञान नगराची स्थापनाही याच बँकेच्या सहकार्याने झाली आहे. कृषी, पुरवठा साखळ्या, ई-व्यापार, विशेष आर्थिक क्षेत्रे इत्यादी घटक या संघटनेला अधिक बळकट करीत आहेत. संघटनेने आता लघु आणि मध्यम उद्योगांच्या हितालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ब्रिक्स लस केंद्राचे महत्व

ब्रिक्स देशांच्या संघटनेने स्थापन पेलेल्या लस संशोधन आणि विकास केंद्राचे महत्व मोठे आहे. रेल्वे संशोधन केंद्राचेही कार्य महत्वाचे आहे. पुरवठा साखळ्यांमध्ये रेल्वेची भूमिका निर्णायक ठरते. ब्रिक्स देशांमध्ये पुरवठा साखळ्यांची जोडणी होणे महत्वाचे आहे. कौशल्यवान कामगारवर्ग निर्माण करण्यासंबंधी संघटनेत एकमत झाले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पर्यावरण संरक्षण कळीचा विषय

पर्यावरणाचे संरक्षण हा सर्वांच्या हिताचा सामायिक विषय आहे, ब्रिक्सने रशियाच्या अध्यक्षतेत ‘ओपन कार्बन मार्केट भागिदारी’ या संकल्पनेचा प्रारंभ केला आहे. भारतही हरित ऊर्जा विकासाला प्राधान्य देत असून कार्बनचे उत्सारण कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. ब्रिक्स देशांनी पर्यावरणसंरक्षणात पुढाकार घेणे ही महत्वाची बाब असल्याचा मुद्दा त्यांनी भाषणात आवर्जून मांडला.

स्थानिक चलनाचा उपयोग

ब्रिक्स देशांनी आपल्या स्थानिक चलनात एकमेकांशी व्यवहार करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. भारत या संबंधातील आपला अनुभव सर्व देशांशी वाटून घेऊ इच्छितो. ब्रिक्सचा आणि भारताचा बहुकेंद्री जगावर विश्वास आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचेही विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे, असे अनेक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात ब्रिक्स नेत्यांसमोर प्राधान्याने मांडले.

नव्या विश्वव्यवस्थेवर भर

ड नव्या शांततामय विश्वव्यवस्थेला प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त

ड पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिला भर

ड जगाच्या अर्थव्यवस्थेत ब्रिक्सचे योगदान अनन्यसाधारण आणि निर्णायक

ड ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेचा दक्षिण गोलार्धातील देशांना बराच मोठा आधार

Advertisement
Next Article