कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेपाळमध्ये वेगाने वितळत आहेत ग्लेशियर

06:04 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

200 कोटी लोकांवर पडणार प्रभाव, भारतात येणार नैसर्गिक आपत्ती

Advertisement

8,848 मीटरच्या उंचीसह माउंट एव्हरेसट पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर आहे, परंतु याची उंची याला उष्ण होत चाललेल्या हवामानाच्या प्रभावांपासून वाचवू शकत नाही. एव्हरेस्टचे सर्वात उंच ग्लेशियर साउथ कोल 1990 च्या दशकाच्या अखेरपासून 54 मीटरपेक्षा अधिक आकारात आकुंचित झाला आहे.

Advertisement

अलिकडच्या अध्ययनांतून हिमालयीन ग्लेशियर वेगाने वितळत असल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंटचे क्रायोस्फियर तज्ञ शरद जोशी यांनी ग्लेशियर्स वितळल्याने समुद्राच्या पातळीत वाढ आणि जलसंपदावर प्रभाव पडू शकतो असे सांगितले आहे.

हिंदुकुश हिमालयात वितळत आहेत ग्लेशियर्स

हिंदु कुश हिमाल क्षेत्र 8 देशांमध्ये फैलावलेले आहे, यातील ग्लेशियर्स वितळण्याचा प्रकार वाढते जागतिक तापमान आणि स्थानिक हवामानामुळे होत आहे. पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून उंचीवरील क्षेत्रांमध्ये अधिक पाऊस आणि कमी हिमवृष्टी होत आहे. आयसीआयएमओडीच्या अध्ययनानुसार 2011 आणि 2020 दरम्यान हिंदुकुश हिमालयातील जवळपास 56000 ग्लेशियर्स मागील दशकाच्या तुलनेत 65 टक्के वेगाने वितळले आहेत. या शतकाच्या अखेरपर्यंत ते स्वत:च्या आकाराचा 80 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा गमावू शकात. नेपाळच्या लंगटांग खोऱ्यातील याला ग्लेशियर देशातील सर्वाधिक अध्ययन करणत आलेल्या ग्लेशियर्सपैकी एक आहे.

एक तृतीयांशाने आकार कमी

आयसीआयएमओडीकडून अध्ययन केल्या जाणाऱ्या ग्लेशियर्सपैकी ह ाएक आहे. याला हा हिमालयीन क्षेत्रातील एकमात्र ग्लेशियर आहे, जो ग्लोबल ग्लेशियर कॅज्युअल्टी लिस्टमध्ये सामील आहे, जो अलिकडेच विलुप्त किंवा गंभीर स्वरुपात लिप्तप्राय ग्लेशियर्सच्या वर्ल्ड अॅटलसमध्ये आहे.

1974 आणि 2021 दरम्यान याला ग्लेशियर्सचा एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रमाणात आकार घटला आहे. हे ग्लेशियर आगामी 20-25 वर्षांमध्ये गायब होऊ शकते. दरवेळी मी जेव्हा ग्लेशियरची पाहणी करतो, तेव्हा मला याचे मोठे नुकसान पाहून निराश व्हायला होते असे शरद जोशी यांनी म्हटले आहे.

नेपाळमध्ये ग्लेशियर वितळणार, भारतावर प्रभाव

नेपाळमध्ये ग्लेशियर्स वितळण्याचा प्रकार स्थानिक आणि जागतिक स्तरावर समुदाय आणि नैसर्गिक व्यवसथेवर अनेक प्रभाव पाडतो. ग्लेशियसं मागे हटल्याने प्रोग्लेशियल सरोवरं निर्माण होतात, ही सरोवरं बर्फ किंवा ढिगाऱ्याने निर्मित नैसर्गिक भिंतींनी वेढलेली असतात, ज्यांना मोरेन म्हटले जाते. भूस्खलन किंवा भूकंपानंतर या भिंती अचानक तुटल्याने (ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स) पूर येतो आणि गाव, रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्प आणि अन्य पायाभूत प्रकल्पांवर विनाशकारी प्रभाव पडू शकतो. याचा प्रभाव भारतावरही दिसून येऊ शकतो.

ग्लेशियर मागे हटल्याचा प्रभाव

ग्लेशियर वितळण्याचा प्रभाव क्षेत्रीय आणि जागतिक स्तरावर समान स्वरुपात गंभीर आहे. नेपाळी आणि हिमालयीन ग्लेशियर जगातील काही सर्वात महत्त्वपूर्ण नद्यांना पाणी प्रदान करतात, ज्यात गंगा आणि यलो नदी सामील आहे. सुमारे दोन अब्ज लोक हिमालयीन ग्लेशियर आणि बर्फापासून प्राप्त होण्याच्या पाण्यावर निर्भर आहेत. ग्लेशियर मागे हटल्याने नदीच्या प्रवाहात कमी येते, ज्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होते, यातून शेतीला नुकसान पोहोचते. पेयजलाची उपलब्धता मर्यादित होते. तसेच हवामानात मोठा बदल घडून येण्याची शक्यता असते.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article