For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:च्या मुलांना तमिळ नाव द्या!

06:31 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वत च्या मुलांना तमिळ नाव द्या
Advertisement

उपमुख्यमंत्री उदयनिधी यांचे नवविवाहितांना आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्याच्या लोकांना स्वत:च्या मुलांना तमिळ नाव देण्याचे आवाहन केले आहे. स्वत:च्या अपत्यांना एखादे सुंदर तमिळ नाव देण्याची विनंती मी नवविवाहितांना करत आहे. अनेक लोक तामिळनाडूत हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थेट स्वरुपात असे करता येणार नाही. याचमुळे ते आमचे राजकीय गीत तमिळ थाई वाजथुमधून काही शब्द हटवू पाहत आहेत. नव्या शिक्षण धोरणाद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांना सातत्याने अपयश पत्करावे लागत असल्याचा दावा उदयनिधी यांनी केला आहे.

Advertisement

प्रथम कुणीतरी तामिळनाडूचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्ण राज्याकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यावर त्यांना माफी मागावी लागली. आता काही लोक तमिळ थाई वाजथुमधून द्रविडम हा शब्द हटविण्याबद्दल बोलत आहेत. जोपर्यंत द्रमुकचा अखेरचा कार्यकर्ता जिवंत आहे, जोपर्यंत अखेरचा तमिळी जिवंत आहे तोपर्यंत तमिळ, तामिळनाडू आणि द्रविडमला कुणी स्पर्शही करू शकणार नाही. तामिळनाडू कधीच हिंदीचा स्वीकार करणार नसल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे.

लोकसभा परिसीमन प्रक्रियेमुळे अनेक दांपत्यांच्या 16 (प्रकारच्या संपत्ती) अपत्यांची तमिळ म्हण प्रत्यक्षात साकार होऊ शकते. परिणाम कोणताही असो लोकांनी स्वत:च्या मुलांना तमिळ नाव द्यावे. नवविवाहित जोडप्यांनी आता कमी अपत्य जन्माला घालण्याचा विचार त्यागावा असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सामूहिक विवाहसोहळ्याला संबोधित करताना म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.