महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्ज भरण्यासाठी मुदत द्या

11:41 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सावळगी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : सावळगी, ता. गोकाक येथील नागरिकांनी फायनान्स व स्वसाहाय्य संघाकडून कर्ज घेतले असून कर्जाच्या वसुलीसाठी संबंधितांकडून तगादा लावला जात आहे. सध्या रोजगार नसल्यामुळे कर्ज भरणे अशक्य असून, मुदत देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना देण्यात आले. सतत कोसळलेल्या पावसामुळे रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वसाहाय्य संघ व फायनान्सकडून घेतलेले कर्ज अदा करणे कठीण झाले आहे. रोजगार नसल्यामुळे हप्ता भरता येत नाही. त्यामुळे हप्ते थकत आहेत. मात्र, स्वसाहाय्य संघ व फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला जात आहे. सध्या आर्थिक अडचण असल्याने परतफेड करणे अशक्य आहे. यासाठी संबंधित फायनान्स व स्वसाहाय्य संघांना मुदतवाढ देण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

Advertisement

कर्ज न भरल्यास घरे लिलाव करण्याची धमकी

कर्ज न भरल्यास घरे लिलाव करण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबला जात आहे. तर काही जणांनी रोजगारासाठी गाव सोडले आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये मध्यस्थी करून कर्ज भरण्यास मुदत द्यावी. पावसाळा संपल्यानंतर लवकरच कर्जाची परतफेड केली जाईल. यासाठी आपल्याला कालावधी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article