महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...म्हणे मुख्यमंत्री पदक द्या!

10:53 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोने चोरी प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याची शिफारस

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोलनाक्यावर एक कार अडवून त्या कारमधील पाच किलो सोने चोरण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवरच एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोने चोरी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाची मुख्यमंत्री पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे. गोकाकचे तत्कालिन पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार यांच्या नावाची 2023 सालासाठीच्या मुख्यमंत्री पदकासाठी शिफारस करण्यात आली असून यादगिरी जिल्ह्यातील गुरमिटकलचे आमदार शरणगौडा कंदकूर यांनी याला आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक पत्र पाठवून चोरी प्रकरणात सहभागाचा संशय असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक कसे देता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

भाजपनेही या शिफारशीबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून ‘सोने चोरलेल्यांना पदक’ अशा शब्दात ट्विटरवर सरकारवर टीका केली आहे. चार वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. 9 जानेवारी 2021 रोजी मंगळूर येथील तिलक पुजारी यांची कार अडवून सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचे 4 किलो 900 ग्रॅम सोने पळविण्यात आले होते. याप्रकरणी 26 मे 2021 रोजी यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. मंगळूरहून कोल्हापूरला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर कार अडवून पोलीस अधिकाऱ्यांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या आवारात कारमधील सोने पळविले होते. याप्रकरणी किरण वीरनगौडरसह काही पोलीस अधिकाऱ्यांवरही एफआयआर दाखल झाला होता. तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास,पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार यांच्यासह चार अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. सीआयडी चौकशीतही चोरीचे सोने जप्त करणे शक्य झाले नाही. या प्रकरणानंतर जावेद इनामदार यांची उचलबांगडी करण्यात आली होती. ते सध्या यादगिरी उपविभागात कार्यरत आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदक देण्याऐवजी त्यांच्यावरही आरोपांची चौकशी करण्याची मागणीही आमदार शरणगौडा यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article