कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Eknath Shinde | कराडच्या विकासासाठी 'यशवंत –लोकशाही'ला सत्ता द्या ; एकनाथ शिंदेंचे आश्वासन

04:14 PM Nov 29, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                             कराड नगरपालिकेत परिवर्तनाची घोषणा

Advertisement

कराड : कराड ही महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञ भूमी आहे. महाराष्ट्राच्या विकासाची गुढी या भूमीतून उभी राहिली, तोच वारसा पुढे नेण्यासाठी कराड नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना प्रणित यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी एकत्र आली आहे.

Advertisement

या आघाडीला सत्ता द्या. कराडच्या विकासाची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. कराड नगर पालिका निवडणुकीतील शिवसेनाप्रणित यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव तसेच सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, मलकापूरचे शिवसेनेचे उमेदवार अक्षय मोहिते तसेच कराडमधील दोन्ही आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण ही आपली आवडती योजना आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या लाडक्या बहिणींमुळेच गत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. शिवसेनेचे ८० पैकी ६० आमदार निवडून आले.

त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री असताना राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्यातून मी कराडला ३२५ कोटी रूपयांइतका निधी दिला आहे. अजूनही बरीच कामे करावयाची आहेत. अजूनही विकासकामांचे प्रस्ताव आहेत. ते नगर विकास विभागाच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. राजेंद्रसिंह यादव हा जनतेतला माणूस असून त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

राजेंद्रसिंह यादव आणि बाळासाहेब पाटील हे एकत्र आल्याने येथे विरोधकांचे डिपॉझिट सुद्धा राहणार नाही. कराडचा विकास वनलाईन अजेंडा आम्ही राबवणार आहोत. कराडमध्ये परिवर्तन घडवून बघा विकास काय असतो? हे तुम्हाला पुढील काळात दाखवून देऊ, असे सांगत त्यांनी कराडच्या विविध विकास कामांच्या प्रस्तावांना लवकरच निधी देण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.

आम्हाला सत्ता दिल्यास पुढील काळात शहराचा कोणताही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. पुढील २०५६ बारापर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरून शहराला आवश्यक असणारी विकासकामे करणार आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, कराडकर जनतेचा आतला आवाज ऐकून दोन्ही आघाड्या निवडणुकीत एकत्र आल्या आहेत. या दोन्ही आघाड्यांवर कराडकरांनी विश्वास ठेवावा. लोकांच्या मनातील कराड शहर उभे करण्याचा प्रयत्न करू. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, शहराच्या विकासासाठी

Advertisement
Tags :
#EknathShinde#KaradDevelopment#KaradElection#LokshahiAghadi#MunicipalElection#PoliticalCampaign#tarun_bharat_news#tarunbharatSocialMedia#YashwantVikasAghadimaharashtrapolitics
Next Article