महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लिंगायत समाजाला सरकारी योजनांचा लाभ द्या

11:42 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लिंगायत महावक्कुटतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : लिंगायत समाजासाठी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान मंजूर केले आहे. मात्र या अनुदानाचा अद्यापही लाभ करून देण्यात आलेला नाही. यामुळे समाजाच्या विकासाला खिळ बसली आहे. याची त्वरित दखल घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन लिंगायत महावक्कुटतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. लिंगायत समाजासाठी सरकारकडून आलेल्या योजनांचा लाभ करून देण्यात आलेला नाही. नवीन योजनाही मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे समाजाचे विकासाचे कार्य रखडले आहे. समाजाच्या विकासासाठी आलेल्या योजनांमध्ये गैरकारभार होऊ नये याची दखल घेण्यात यावी. लिंगायत समाजाच्या विकासाठी आपली संघटना अहोरात्रा कार्यरत आहे. यासाठी तालुका पंचायत, जि. पं., महिला आणि बाल कल्याण खाते, कन्नड व संस्कृती खाते, समाज कल्याण खाते, सदर खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी समाजाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रेम चौगुला, बसवराज चेट्टर, रविंद्र बेल्लद, मल्लिकार्जुन तिम्मवगोळ, कुमार गोडीहाळ, प्रसाद हिरेमठ आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article