महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पालयेतील स्वांतत्र्यसैनिक शांबा पालयेकर कुटुंबीयास न्याय द्या

11:51 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बलिदानाचे स्मरण, पवित्र निवासस्थानी सोहळा

Advertisement

पालये : गोवा मुक्तीसाठी असंख्य हुतात्मा व्यक्तींनी प्राणाची आहुती दिली,त्यात पालये गावचे स्वांतत्र्य सैनिक शंबा कृष्णा पालयेकर व त्यांचे पुत्र कृष्णा शामबा पल्येकर यांचे अमूल्य योगदान महत्वाचे असून त्यांचे दरवर्षी स्मरण करणे आवश्यक असून हा इतिहास भावी पिढीसमोर असणे गरजेचे असल्याचे मत स्वराज संस्था मांद्रेचे संस्थापक ?ड प्रसाद शहापूरकर यांनी व्यक्त केले. भंडारवाडा पालये गावातील स्वांतत्र्य सैनिक पालयेकर पिता पुत्राच्या स्मृतीला वंदन कार्यक्रमात बोलत होते.स्वातंत्र्यसैनिक पालयेकर यांच्या गोवा मुक्ती लढ्यातील कार्याचा उदोउदो झाला नाही, साडे तीन वर्षे तुऊंगात सजा भोगली व मुक्तीनंतर घरी परतले.मात्र त्यांचे कुटुंबीय सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात त्यांच्या कार्याचे स्मरण करणे असा अनोखा कार्यक्रम पालयेतील त्यांच्या पवित्र निवासस्थानी होत असल्याचे समाज कार्यकर्ते प्रसाद शहापूरकर यांनी नमूद केले.

Advertisement

स्वांतंत्र्यासैनिक पालयेकर यांची सरकारदरबारी नोंदणी असून आवश्यक सन्मान प्राप्त झाले आहे.मात्र त्यांचे कुटुंबीय सुविधांपासून वंचित असून,ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन आयुष्याची अनमोल वर्षे वाया घालवली, अशा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला निवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर अपेक्षित जीवन जगण्याची पाळी आल्याचे ?ड शहापूरकर यांनी व्यक्त केले. आम्ही पेडणे तालुक्यातील जनता त्यांना विसरली नाही,आपल्या बलिदानाची कदर आहे.तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ नये ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांचे निवासस्थान हे सामाजिक मंदिर असून,त्या पवित्र स्थानी स्मरण कार्यक्रम होत आहे, ह्याचा अभिमान पेडणे तालुक्यातील ग्रामस्थांना निश्चीत आहे. यावेळी मधुकर पालयेकर यांनी स्वांतंत्र्यसैनिक शांबा यांच्या कार्याची माहिती दिली व त्या कुटुंबीयांनी खूप हाल काढले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती पालयेकर यांनी केली. त्यांच्या काकी गीता पालयेकर यांनी भाऊक होऊन कुटुंबास आधार देण्याची विनंती केली.

स्थानिक आमदाराने न्याय द्यावा : नामदेव तुळसकर

स्वातंत्र्य सैनिक शांबा पालयेकर कुटुंबीयांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेत बलिदान दिले. तुऊगांत सजा भोगली. मात्र त्यांचे कुटुंबीय उपेक्षित असून दु:ख वाटते. बलिदान देऊनही कदर होत नसल्याने खंत आहे.आमदार जीत आरोलकर यांनी त्यांच्या मुलीस न्याय द्यावा,सरकारी नोकरी मिळवून द्यावी अशी विनंती समाजकार्यकर्ते नामदेव तुळसकर यांनी केली.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच

मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर,पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर आदींनी ह्या सोहळ्याची दखल घेऊन स्वातंत्र्यसैनिक शांबा पालयेकर कुटुंबीयास नोकरीची शाश्वती द्यावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी पणती पेटवून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article