आगामी हवामान बदल परिषद आयोजनाची संधी भारताला द्या!
पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव : ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’वर भर देण्याचेही सुतोवाच
वृत्तसंस्था/ दुबई
आगामी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन भारतात करण्याचा प्रस्ताव शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. आज या व्यासपीठावरून मी 2028 मध्ये होणाऱ्या ‘सीओपी-33’चे आयोजन भारतात करण्याचा प्रस्ताव ठेवतो, अशी आग्रही मागणी पंतप्रधानांनी केली. भारताने पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यात परिपूर्ण समतोल साधून जगासमोर विकासाचे मॉडेल सादर केले आहे, असे दुबईतील सीओपी-28 मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले. भविष्यातील रणनिती ठरविण्यासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अंतर्गत सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुऊवार, 30 नोव्हेंबरला रात्री संयुक्त अरब अमिरातीला पोहोचले. युएईमध्ये भारतीय स्थलांतरितांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी लोकांनी मोदी-मोदी आणि यावेळी मोदी सरकारच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर गुरुवारी ते संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक ‘सीओपी-28’मध्ये सहभागी झाले. या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी प्रतिनिधी देशांना संबोधित केले. भारताने पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील समतोल साधत जगासमोर एक उत्तम उदाहरण मांडले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के लोक भारतामध्ये आहेत, तरीही जागतिक कार्बन उत्सर्जनातील योगदान 4 टक्क्मयांपेक्षा कमी आहे. भारत एनडीसीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या जगातील काही निवडक अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 2030 पर्यंत उत्सर्जन 45 टक्क्मयांनी कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. आम्ही गैर-जीवाश्म इंधनाचा वाटा 50 टक्क्मयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 2070 पर्यंत निव्वळ शून्याच्या आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू ठेवू, असेही पंतप्रधान म्हणाले.
सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करा
ऊर्जा व्यवहार व्हायलाच हवेत, अशी प्रतिज्ञा घ्यावी लागेल, पण त्यासाठी नाविन्यपूर्ण व्हावे लागेल. आपल्या स्वत:च्या हितसंबंधांच्या वरती राहून सतत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचा आणि तंत्रज्ञान इतर देशांमध्ये हस्तांतरित करण्याचा संकल्पही आपल्याला करावा लागेल, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
युएईमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुऊवारी रात्री संयुक्त अरब अमिराती येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक (सीओपी-28) जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले. यावेळी दुबईतील भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. यावेळी लोकांनी मोदी-मोदी आणि मोदी सरकार जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. यासंबंधी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असून भारतीय समर्थक लोक ‘मोदी, मोदी’, ‘अबकी बार मोदी सरकार’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देताना दिसून येत आहेत. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी लोकांशी हस्तांदोलन करताना आणि बोलताना दिसत आहेत.
‘जगाला मोदींसारख्या नेत्याची गरज’
एका अनिवासी भारतीयाने मोदींना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘मी 20 वर्षांपासून युएईमध्ये राहतोय, पण आज मोदींना भेटून खूप आनंद झाला. आपल्या परिवारातीलच कोणालातरी भेटल्याची भावना मनात निर्माण झाली. नरेंद्र मोदी हे भारताचा हिरा असून त्यांच्यात जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे, असे त्याने सांगितले. तसेच ‘पंतप्रधान मोदींना येथे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. जगाला पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची गरज आहे’, असे आणखी एक सदस्य म्हणाला.
पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
दरम्यान, दुबईत भारतीय समुदायाला भेटल्यानंतर मोदींनीही आनंद व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपले विचार व्यक्त केले. “दुबईत भारतीय समुदायाचे स्वागत पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. त्यांचा पाठिंबा आणि उत्साह आमच्या दोलायमान संस्कृतीचा आणि दृढ संबंधांचा पुरावा आहे,” असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.