प्राचीन वास्तूंच्या संरक्षणाला महत्त्व द्या
डॉ. मल्लिकार्जुन मेत्री यांचे प्रतिपादन : विजापुरात जागतिक संग्रहालय दिन साजरा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
वार्ताहर /विजापूर
आपल्या भूतकाळातील वैभवाची जाणीव करून देण्याची दृष्टी तरुणांकडे असायला हवी. प्राचीन वास्तूंचे संरक्षण करणे ही आजच्या युवकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सिकब एआरएसआय कन्नड विभागाचे डॉ. मल्लिकार्जुन एस. मेत्री यांनी केले. ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, धारवाड झोनच्यावतीने गोलघुमट येथील पुरातन वस्तुसंग्रहालय येथे आयोजित आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्याला इतिहास माहित नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तसेच ज्यांच्या गावातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत ती संग्रहालयांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तरच पुरातन गावाचा पत्ता, रहिवाशांची नावे याची माहिती मिळू शकेल. संग्रहालये व जुन्या वास्तूंचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले.
भारत देशाला सांस्कृतिक वारसा
साहाय्यक पुरातत्वशास्त्रज्ञ एन. प्रसन्नकुमार म्हणाले, भारत देशाला अनेक वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आहे. पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी इतिहास आहे. तो समजून घेणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे, असे सांगितले. अनिलकुमार जी. थॉबी म्हणाले, लोकांमध्ये आपल्या सांस्कृतिक संपत्तीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संग्रहालये खूप महत्त्वाचे काम करतात. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान, निबंध स्पर्धा, चित्रकला (चित्रकला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे व विभागीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेश बिरादार यांनी केले, कार्यक्रमास आर. एम. करजगी, विष्णूपंथ गौडा यांच्यासह संग्रहालयाचे पदाधिकारी, उद्यान कर्मचारी, पर्यटक, व्ही. बी. दरबार हायस्कूल, बीसीएमचे विद्यार्थी उपस्थित होते.