For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्या

12:29 PM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्या
Advertisement

मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना ग्रॅच्युईटीची रक्कम द्यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुका शाखेने केली आहे. बुधवारी (ता. 29) मोर्चाने सुवर्णसौधवर जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या य़ांच्या नावे बालकल्याण योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 1975 मध्ये स्थापन झालेल्या समग्र शिशु विकास योजनेचा मोठा विस्तार झाला असून आज या योजनेचे 50 लाख लाभार्थी आहेत. या योजनेतून अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिका म्हणून 150 ऊपये इतक्या अल्प मोबदल्यात सेवा बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना कायदा 1972 लागू होतो, असा आदेशवजा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 मध्ये दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना ग्रॅच्युईटीची रक्कम द्यावी, अशी मागणी घेऊन जानेवारी 2023 मध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत महिला-बालकल्याण खात्याने एप्रिल 2023 पासून ग्रॅच्युईटी लागू केली आहे. याचा लाभ 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या 10,311 अंगणवाडी कार्यकर्त्या व 11,980 साहाय्यिकांना मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महिला-बालकल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे 18 कोटींचे अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, वित्त खात्याकडून हे अनुदान वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.