महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ द्या

11:47 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कामगार आयुक्त अमरेंद्र यांना निवेदन : निधी त्वरित देण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांसाठी कामगार खात्याकडून आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबिर रद्द करा. त्याऐवजी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, विवाह मदतनिधी या योजनेतून त्वरित निधी मंजूर करा, अशा मागणीचे निवेदन कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्यातर्फे कामगार आयुक्त अमरेंद्र यांना देण्यात आले. राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत आहे. 342 कोटींचा गैरकारभार झाला असल्यामुळे नोंदणीकृत कामगारांना सरकारच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

Advertisement

कामगार खात्याकडून कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, कामाच्या साहित्याचे कीट, आहार कीट देण्याऐवजी सदर रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यावर जमा करा. कामगारांसाठी आरोग्य शिबिर राबवून याबाबतचा अहवाल कामगार खात्याला देण्यात येईल, असे सादर केलेल्या निवेदनाद्वारे कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. कामगारांच्या मुलांसाठी निधी देण्याची मागणी सध्या कामगारांना त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, विवाह मदतनिधी यांची गरज असून त्वरित हा निधी संबंधित कामगारांना वितरीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राहुल पाटील, सुरेश माऱ्याकाचे, सोमनाथ पाटील, परशराम बिळगोजी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article