For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेची सेवा करण्याची संधी द्या

06:26 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेची सेवा करण्याची संधी द्या
Advertisement

मृणाल हेब्बाळकर : मार्कंडेयनगर परिसरात प्रचार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या 20 वर्षांपासून भाजप पक्षाच्या उमेदवाराला अधिकार दिला आहे. यावेळी आपल्याला एकदा जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विविध भागात संपर्क साधून मार्कंडेयनगर येथे प्रचार सभेत ते बोलत होते.

Advertisement

केंद्र आणि राज्य सरकारची कामे वेगवेगळी असतात. केंद्राकडून मोठमोठ्या योजना आणणे शक्य असते. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करणे शक्य आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत होते. मात्र, गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांकडून जनतेच्या अपेक्षेनुसार काम केले गेले नाही. कोणताही मोठा प्रकल्प राबविलेला नाही. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या योजना राबवून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होते. मात्र, भाजप खासदारांकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच मतदारसंघाचा विकासही खुंटला आहे.

गेल्या 20 वर्षांपासून भाजप उमेदवाराला संधी दिली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून जनतेची सेवा करण्याची आपल्याला एकदा संधी देण्यात यावी. मतदारसंघामध्ये विकासकामे राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी काँग्रेस उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध महिला संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.