कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभय कुरुंदकरला फाशीची शिक्षा द्या

12:14 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे यांचे अपहरण, हत्या, शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. अभय कुरुंदकर व त्याच्या साथीदारांनी अत्यंत निर्दयी आणी व्रुरपणे ही हत्या केली असून, अभय कुरुंदकरला फाशीची शिक्षा द्यावी असा युक्तीवाद शुक्रवारी विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी केला. शुक्रवारी बिद्रे खून खटल्याची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कृ. . पालदेवार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दोनही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी सोमवारी (21 एप्रिल) रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Advertisement

तत्पूर्वी 5 एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी या हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरसह दोन साथीदारांना दोषी ठरविले होते. कुरुंदकरसह आश्विनीच्या हत्याप्रकरणी साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकरला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. शुक्रवारी (दि.11) अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेच्या सुनावणी झाली. सुमारे दोन तासाहून अधिक काळ याबाबत युक्तीवाद झाला.

सरकारी वकील अॅङ प्रदीप घरात यांनी युक्तीवाद करत असताना आश्विनी बिद्रे यांचा खून अत्यंत नियोजनबद्ध आणि शांत डोक्याने करण्यात आला आहे. त्यांचे अपहरण करुन, मोबाईल ताब्यात घेवून तपासकामी बाहेरगावी गेल्याचे भासविण्यात आले. यानंतर त्यांचा निर्दयीपणे खून करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते खाडीत फेकून देण्यात आले. अत्यंत दुर्मिळातील दुर्मीळ खटला असून न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींचे वकील अॅङ विशाल भानुशाली यांनी अभय कुरुंदकर यांनी पोलीस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दया दाखवण्यात यावी. तसेच कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती न्यायालयासमोर केली. दोनही बाजूचा युक्तिवाद सुमारे दोन तासाहून अधिक वेळ चालला. दोनही बाजूचा युक्तीवाद एwकून घेतल्यानंतर आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी (21 एप्रिल) रोजी देण्यात येणार असल्याचे न्यायाधीश पालदेवार यांनी सांगितले.

शुक्रवार सुनावणीसाठी अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धी गोरे, पती राजू गोरे, वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी न्यायालयाने हत्याकांडातील दोषींना किती शिक्षा व्हायला पाहिजे असा प्रश्न न्यायालयाने विचारला. यावेळी बिद्रे कुटूंबाने आरोपींवर दया दाखवून नये फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

अश्विनी यांची मुलगी सिद्धी गोरे हिला मदत किती हवी? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. मात्र आम्हाला कुरुंदकरकडून कोणतीच नुकसान भरपाई नको, राज्यशासनाने आम्हाला आश्विनीचा 2017 पासूनच्या पगाराची रमक्कम सिद्धीच्या नावावर द्यावी अशी मागणी आश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली.

सिद्धी आईच्या आठवणीने भावूक झाली. ती म्हणाली, मी इयत्ता पहिलीत असताना आईला भेटले होते. या गोष्टीला आज दहा वर्षे झाली. माझ्या कुटुंबाला खूप स्ट्रगल करावं लागलं. करावी लागली. आईला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या वडिलांना कोल्हापूर ते अलिबाग आणि पनवेल केससाठी फेऱ्या मारल्या आहेत. आमच्या कुटूंबाने खूप काही सहन केले आहे. धमक्या आणि दहशत सहन केली असून आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे असे आश्विनी बिद्रे यांच्या कन्या सिद्धी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तपासामध्ये पहिल्या टप्प्यात खूप हलगर्जीपणा झाला, मात्र नंतरच्या टप्प्यात तपास योग्य पद्धतीने होवू न्याय मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.

                                                                                                                                   सिद्धी गोरे

11 एप्रिल 2016 : आश्विनी बिद्रेची हत्या

31 जानेवारी 2017 : कळंबोली पोलिस ठाण्यात अपहरण, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

फेब्रुवारी 2017 : गुन्हा दाखल होताच अभय कुरुंदकर गायब

7 डिसेंबर 2017 : कुरुंदकरला अटक

20 फेब्रुवारी 2018 : कुरुंदकरला मित्र कुंदन भंडारीला अटक

19 मे 2018 : कुरुंदकरसह साथीदारावर दोषारोपपत्र दाखल

5 एप्रिल 2025 : कुरुंदकरसह तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले.

हत्यांकाडप्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी आता 21 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आजच्या (दि.11) सुनावणीत न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती, मुलगी, वडील, भाऊ यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तसेच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांचेही म्हणणे एकूण घेण्यात आले.

न्यायालयाने दोनही बाजूचा युक्तीवाद एwकून घेतल्यानंतर बिद्रे कुटूंबास म्हणणे मांडण्यास सांगितले. यावेळी सिद्धी गोरे बोलण्यास उभ्या राहिल्यानंतर आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात आश्रु आले. यामुळे न्यायालयातील सर्वच जण भावूक झाले आणि न्यायालयामध्ये भयाण शांतता पसरली. यावेळी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, महेश फळणीकर या तिघांसह निर्दोष मुक्तता झालेले राजेश पाटीलही न्यायालयात उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article