जीआयटीच्या यशस्वी क्रीडापटूंचा गौरव
बेळगाव : बेंगळूर येथे ग्लोबल अकादमी ऑफ तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयु राज्यस्तरीय चषक शरीरसौष्ठव, वेटलिफ्टिंग व कुस्ती स्पर्धेत जीआयटीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल जीआयटीच्या व्यवस्थापन मंडळाकडून खास गौरव करण्यात आला.सदर स्पर्धेत बेस्ट फिजिक्स विभागात ओम पाटील व सिल यांनी रौप्यपदक पटकाविले. तर श्रेयस कांस्यपदक घेतले. वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवराज कोंडुसकरने आपल्या वजनी गटात कांस्यपदक मिळविले. तर कुस्तीमध्ये भुवेश्वरीने रौप्यपदक पटकाविले.या कामगिरीची दखल घेवून केएलएस जीआयटी तांत्रिक महाविद्यालयाचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, सभासद आर. एस. मुतालिक, एस. व्ही. गणाचारी, प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, प्रा. दिगंबर कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा खास गौरव करण्यात आला. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ. जॉर्ज रॉड्रिक्स, प्रा. विख्यात कट्टी, शुभस्वा शिकरे, शिवानी कारले व निकीता पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहेत.