महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्हिटीयु जलतरण स्पर्धेत जीआयटीचे यश

10:08 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिजान इराणीची 9 पदकांची कमाई

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालय आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी महाविद्यालयाच्या जलतरणपटूंनी 5 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. बसवनगुडी जलतरण तलावात झालेल्या स्पर्धेत संपूर्ण कर्नाटक राज्यातील तांत्रिक महाविद्यालयाच्या 500 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत जीआयटी महाविद्यालयाच्या क्रिजान इराणीने 50 व 100, 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 3 सुवर्ण, 200 मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण, 50 मीटर व 100 मीटर बटरफ्लाय 1 सुवर्ण 1 रौप्य, 100 व 800 मी. फ्रिस्टाईलमध्ये 2 रौप्य, 50 मी ब्रोस्टट्रोकमध्ये कास्य पदक एकूण 5 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कास्य पदक पटकाविले. तर रितू हेरेकरने 1 कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत जीआयटी महिला संघाने दुसरे उपविजेते पद पटकाविले. या दोन जलतरणपटूंना जीआयटी महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक आकाश मंडोळकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article