महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीआयटी, जैन, गदग संघ पुढील फेरीत

10:27 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हीटीयू चषक आंतर तांत्रिक महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : केएलएस जीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक आंतर तांत्रिक महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत केएलएस गोगटे संघाने एचआयटी निडसोशी संघाचा, टीसीई गदग संघाने अंगडी संघाचा, जैन तांत्रिक संघाने एसजीबीआयटीचा तर केएलएस जीआयटीने जैनचा पराभव केला. कार्तिक कविमुदकन्नावर, आकाश टॅटी, जिनत ए.बी.एम., अविचल अमनगी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जैन तांत्रिक संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 164 धावा केल्या. त्यात लोहीत तमन्नाचेने 39, विघ्नेश दोडमनीने 35, श्रीधर कांबळेने 24 तर कुशल पुजारीने 18 धावा केल्या. निडसोशीतर्फे श्रीधर गवंडीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना निडसोशी संघाचा डाव 14.3 षटकात 100 धावांत आटोपला. त्यात रघुने 18, सत्यजीत स्वामीने 16 तर चेतन वाय.ने 10 धावा केल्या. जैनतर्फे कार्तिक कवीमुदकन्नावरने 4, अर्चित व लोहीत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात अंगडी महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी बाद 153 धावा केल्या. त्यात कृष्णा रेड्डीने 39, श्रीधर हुलकेरीने 20, आशिष प्रधान व ओम मन्नोळकरने प्रत्येकी 16 तर ज्ञानेश्वर कुंभारने 14 धावा केल्या. गदगतर्फे कार्तिक कुलकर्णी, अथर्व हन्नुर, आकाश टॅटी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गदग संघाने 18 षटकात 7 गडी बाद 154 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात अनुराघ तांडेलने 39, अथर्व हन्नूरने 29, निलकंठ मांडेने 25,  आकाश टॅटीने 21 धावा केल्या. अंगडीतर्फे शुभम बुवाने 3 तर स्वप्नील व शुभम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात जैनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 213 धावा केल्या. त्यात जिनत ए. बी. एम.ने 70, प्रज्वल राजवाडेने 28, सुचित माललीकरने 27 तर चैतन्य पाटील व अथर्व चोर्लेकर यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. एसजीबीआयटीतर्फे सुशांत कुंपीने 2 तर उत्तम, साई व भूषण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसजीबीआयटी संघाने 20 षटकात 6 गडी बाद 194 धावा जमविल्या.. त्यात अमन पिरजादेने 65, श्रेयश चव्हाणने 53, अभिषेक पाटीलने 19, तर दर्शन कांबळे व प्रदीप बडीगेर यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. जैनतर्फे साई कारेकरने 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात केएलएस जीआयटीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 212 धावा केल्या. त्यात अविचल अमनगीने 85, रोशन बेकवाडकरने 47 तर पीयूष पठाडेने 13 धावा केल्या. जैनतर्फे अनिल बांदिवडेकरने 4 तर विघ्नेश व कार्तिकेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जैन संघाने 20 षटकात 8 गडी बाद 97 धावा केल्या. त्यात एम. सुतारने 24, अर्चित देवारियाने 22, लोहीत तमन्नाचे 21 तर कार्तिकने 11 धावा केल्या. जीआयटीतर्फे जिहान पिरजादेने 3, एस. हावळण्णाचे व पीयूष यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article