For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हीटीयू फुटबॉल स्पर्धेत जीआयटी तिसरा

10:13 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हीटीयू फुटबॉल स्पर्धेत जीआयटी तिसरा
Advertisement

बेळगाव : बेंगलोर येथे झालेल्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी विद्यापीठ आयोजित तांत्रिक महाविद्यालय आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी तांत्रिक महाविद्यालय सीएमआयआरटी बेंगळुरचा पराभव करून  या स्पर्धेत तिसरे स्थानावरती समाधान मानले. निमित्त बेंगलोर संघाने विजेतेपद पटकाविले. बेंगलोर येथे झालेल्या व्हीटीयु चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी तांत्रिक महाविद्यालय संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 16 संघानी भाग घेतला होता. पहिल्या सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने अल्वाज इंजिनिअरिंग महाविद्यालय मंगळूर संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला जीआयटीच्या बसूच्या पासवर निखिल नेसरीकरने पहिला गोल केला.29 व्या मिनिटाला निखिल नेसरीकरच्या पासवर सुदर्शनने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला सुदर्शनच्या पासवर बसू के.ने तिसरा गोल करून 3-0 महत्वाची आघाडी  मिळून दिली.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात जीआयटी संघाने बीआयटीएम बेळ्ळारी संघाचा टायब्रेकर मध्ये 6-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात 32 व्या मिनिटाला निखिल  नेसरीकरने गोल करून 1-0 ची आघाडी आघाडी मिळवून दिली. पण 38 व्या मिनिटाला बल्लारीच्या संकेतने गोल करून 1-1 अशी बरोबरी करत सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचा गोल फलक समान असल्याने पंचानी टाईप ब्रेकरनिमाचा वापर केला. त्यामध्ये जीआयटीने 6-5 असा पराभव केला. जीआयटी तर्फे साहिल काकत्तीकर, यश गवाला। निखिल नेसरीकर, सुदर्शन, कैफ खान व विजय पाटील यांनी गोल केले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात एनएमआयटी बेंगलोर संघाने जीआयटी बेळगाव संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या सत्रात शेवटच्या क्षणी बेंगलोरच्या राजेंद्रने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. जीआयटी बेळगाव संघाला अनेक संधी गोल करण्याच्या होत्या पण त्यांनी वाया घालविल्याने  त्याना पराभवास सामोरे जावे लागले. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने सीएमआयआरटी बेंगलोर संघाचा 2-1 असा पराभव करून तिसरे स्थान फटकाविले. या सामन्यात 18 व्या मिनिटाला निखिल नेसरीकरणे पहिला गोल केला तर सुदर्शनने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला सुशीलने गोल करून एक-दोन अशी आघाडी कमी केली. सामन्यानंतर मान्यवरांचे असते जीआयटी बेळगाव संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.