पाडळीत बारा वर्षापासून गावात जन्मलेल्या मुलींचे ठेव पावतीने स्वागत
'श्रध्दा गौरव पुरस्काराचे' वितरण, संस्थेचा अभिनव उपक्रम
आळते वार्ताहर
पाडळी ता.तासगाव येथील श्रध्दा सार्वजनिक विकास संस्थेच्या वतीने सामाजिक भान जपत गेल्या बारा वर्षापासून गावात जन्मलेल्या मुलीचे स्वागत करून तिच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव पावती ठेवण्याचा उपक्रम सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती सर्व रक्कम त्या मुलीला दिली जाणार आहे. समाजातील मुलींचे घटते प्रमाण व स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी संस्थेचा हा एक प्रयत्न आहे आजपर्यंत अनेक मुलींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त संस्थेच्यावतीने मुलींच्या नावे ठेव पावती वितरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेतील माजी मुख्याध्यापक चंद्रकांत बामणकर सर होते. ते म्हणाले मुलीच्या जन्माचे स्वागत ठेव पावतीने करणारे पाडळी हे गाव सांगली जिल्ह्यातील पहिले गाव असेल. हा उपक्रम राबवणाऱ्या श्रध्दा संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर गावातील अश्विनी पोपट पाटील ही मुलगी लंडन मधील कॅलिफॉर्निया विद्यापीठात इंजिनिअरिंग क्षेत्रातील एम.एस.उच्च शिक्षणासाठी गेल्याबद्दल तिला 'श्रध्दा गौरव पुरस्कर' देऊन सन्मान करण्यात आले. अवनी पंकज ठोंबरे, वैष्णवी जगदीश पाटील, उन्नती विपिन पाटील यांना ठेव पावती वितरित करण्यात आली. प्रवीण पाटील (COT), राजेंद्र शिंदे (सांगली पोलिस), नायब सुभेदार महेश पाटील व माजी मुख्याध्यापक ए.एम.पाटील (वाईकर सर) यांना शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत बामणकर, बाजीराव सुर्वे, नामदेव शेठ, संजय शेठ, सुनिल पाटील, ज्ञानेश्वर, शेठ, महोदव सर्वे प्रवीण सपकाळ, निवास पाटील, सचिन संजय पाटील, महादेव माने, महेश पदमाकर पाटील,संजय भोसले,सचिन पाटील,उपसरपंच अजित पाटील, उदय सर्वे, निशिकांत पाटील,प्रिया शिंदे इ.मान्यवर तसेच ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक संतोष यादव यांनी तर आभार किरण पाटील यांनी मानले.