महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरगुती भांडणामुळे निघून गेलेली मुलगी गुजरातमध्ये सापडली!

04:46 PM Sep 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
Missing Girl
Advertisement

रेल्वेच्या आरपीएफ जवानाच्या मदतीने मुलगी सुखरूपपणे मिळाली

सांगली प्रतिनिधी
घरात झालेल्या किरकोळ भांडणानंतर शहरातील एका उपनगरातील 17 वर्षाची मुलगी शनिवारी सकाळी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिचा नातेवाईकांनी शोध सुरू केला, पण ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे ती हरविल्याची तक्रार संजयनगर पोलिस ठाण्यात दिली. तोपर्यंत ही मुलगी रेल्वेतून गुजरातच्या सीमेवर पोहोचली. पोलिस तपासावेळी मुलगी गुजरात येथे असल्याचे समजले. रेल्वेच्या आरपीएफ जवानांच्या मदतीने तिला वापी स्थानकात थांबवून ठेवले. त्यानंतर पालकांना तात्काळ तिथे पाठवले. त्यांनी रविवारी तिकडे रवाना होत मुलीला सुखरूपपणे ताब्यात घेतले.

Advertisement

उपनगरातील 17 वर्षाची मुलगी शनिवारी सकाळी घरगुती भांडणातून घराबाहेर पडली. कोणास न सांगता तिने रेल्वेस्थानक गाठवले. तेथून ती अजमेरला जाणाऱ्या रेल्वेत बसली. इकडे मुलगी न सापडल्यामुळे पालकांनी संजयनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी गांभीर्य ओळखून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिच्या शोधासाठी मोहीम राबवली. परंतु तिचा ठावठिकाणा समजू शकला नाही. रेल्वेतून निघालेली मुलगी गुजरातच्या सीमेजवळ पोहोचली. रेल्वेत ती रडत असल्याचे पाहून एका प्रवाशाने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने घरातील भांडणानंतर बाहेर पडल्याचे रडत-रडत सांगितले.

Advertisement

प्रवाशाने रेल्वेच्या आरपीएफ जवानांना हा प्रकार कळवला. जवानांनी मुलीला सुखरूपपणे वापी स्थानकावर उतरवले. त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. निरीक्षक कुरळे यांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने पालकांना तिकडे पाठवले. पालकांनी रविवारी वापी येथे जाऊन मुलीला सुखरूपपणे ताब्यात घेतले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Advertisement
Tags :
#Gujaratdisappeared due to domestic disputesangli news
Next Article