Satara : फलटणमध्ये वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून मुलीची आत्महत्या
फलटण शहरात १८ वर्षीय मुलीची आत्महत्या
सातारा : वडील सतत दारु पित असल्याच्या कारणाने मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० वाजता घडला. आँचल लखन पवार (वय १८, रा. सोमवार पेठ, फलटण) असे आत्महत्या केलेल्य मुलीचे नाव आहे. याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आँचलचे वडील लखन यांना दारुचे व्यसन आहे. त्यातूनच तो तिच्या आईसोबत सतत भांडण करत असतो. या सततच्या भांडणाच्या प्रकाराला वैतागलेली आँचल मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला.
याची माहिती कुटुंबीयांना मिळताच वडील लखन पवार यांनी तिला तातडीने फलटणच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परंतु तिचा ३१ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याची खबर फलटण शहर पोलीस ठाण्यात राकेश पवार यांनी दिली. तपास हवालदार रणवरे करत आहेत.