For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशा मुख्यमंत्रिपदासाठी गिरीश मुर्मू यांचे नाव चर्चेत

06:45 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओडिशा मुख्यमंत्रिपदासाठी  गिरीश मुर्मू यांचे नाव चर्चेत
Advertisement

गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ओडिशात भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयी चर्चांना वेग आला आहे. राज्य भाजपचे नेते चर्चेसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभेदरम्यान भाजपचा मुख्यमंत्री 10 जून रोजी ओडिशात शपथ घेणार असल्याची घोषणा केली होती.

Advertisement

अशा स्थितीत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून माजी कॅग आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल गिरीश मुर्मू यांच्यासमवेत काही आमदारांच्या नावाची चर्चा आहे. गिरीश मुर्मू यांच्या नावाची राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये व्यापक स्वरुपात चर्चा होत आहे.

1985 च्या तुकडीच्या गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी मुर्मू हे नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. मुर्मू यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या कार्यकाळादरम्यान मुख्य सचिव म्हणून काम केले होते. तर अमित शहा हे गृहमंत्री असताना ते गृह विभागाचे संयुक्त सचिव देखील होते. भाजप मुर्मू यांना ओडिशाचे मुख्यमंत्री करत आदिवासी समुदायाला स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करू शकतो.

अन्य नेत्यांची नावेही चर्चेत

संबलपूरचे आमदार जयनारायण मिश्रा, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पाटणागाढचे आमदार के. व्ही. सिंह देव, ब्रजराजनगरचे आमदार सुरेश पुजारी आणि केंदुझरचे आमदार मोहन माझी यांच्या नावाचीही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे. ओडिशाचा पुत्रच ओडिशाचा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपच्या विधिमंडळ गटावर हा निर्णय निर्भर असेल आणि पक्षाची संसदीय समिती त्याला मंजुरी देईल असे जयनारायण मिश्रा यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.