गिरियासच्या 180 व्या स्टोअरचे टिळकवाडी येथे उद्घाटन
06:30 AM Dec 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव :
Advertisement
गिरियास या इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणांच्या 180 व्या स्टोअरचे उद्घाटन दीपक कोळवेकर यांच्या हस्ते फीत कापून शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी फॉर्च्यून टॉवर (झुडीओनजीक), खानापूर रोड, टिळकवाडी येथे दिमाखात झाले. या प्रसंगी गिरियासचे संचालक नवीन गिरिया, उत्तर कर्नाटक भागाचे प्रमुख महावीर जैन, जागा मालक मनोज कोळवेकर व परिवार आदी उपस्थित होते. कर्नाटक, गोवा, तामिळनाडू व पुद्दुचेरी येथील 104 शहरांमध्ये गिरियासची 180 दुकाने आहेत. नवीन दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी गिरियासने कॅश बॅक ऑफर, मेगा एक्स्चेंज ऑफर, फायनान्स अशा विविध ऑफर्स ठेवल्या आहेत. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article