For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामार्ग निर्मितीदरम्यान गर्डर कोसळला, एकाचा मृत्यू

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
महामार्ग निर्मितीदरम्यान गर्डर कोसळला  एकाचा मृत्यू
Advertisement

अलप्पुझा : केरळच्या अलप्पुझामध्ये अरुर-थुरवूर एलिवेटेड महामार्गाच्या निर्माणाधीन हिस्स्यातील काँक्रिटचा गर्डर एका पिकअप वाहनावर कोसळला. या दुर्घटनेत पिकअप व्हॅन चालकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी एफआयआर नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. कोसळलेल्या गर्डर्सना हटविण्याचे काम जारी आहे. अलप्पुझा येथील रहिवासी 47 वर्षीय राजेश यांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.  पोलिसांनी निर्माण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार ठरवत गुन्हा नोंदविला आहे. या दुर्घटनेमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.