गिलची तंदुरुस्ती चाचणी आज
06:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुवाहाटी : येथे शनिवारपासून यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीला प्रारंभ होत आहे. पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे कर्णधार गिलला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नव्हती. आता दुसऱ्या कसोटीसाठी कर्णधार गिलची तंदुरुस्ती चाचणी शुक्रवारी घेण्यात येणार असल्याचे संघाचे फलंदाज प्रशिक्षक कोटक यांनी सांगितले आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी भारताचा दारुण पराभव करत आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाला या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी गुवाहाटीची दुसरी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. कर्णधार गिलच्या या दुखापतीमध्ये सुधारणा जाणवत असली तरी दुसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. दरम्यान शुक्रवारी नेटमध्ये होणाऱ्या सरावावेळी गिल उपस्थित राहणार आहे.
Advertisement
Advertisement