For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गिल ग्लॅमर्गनकडून खेळणार

07:05 AM Aug 25, 2022 IST | Tarun Bharat Portal
गिल ग्लॅमर्गनकडून खेळणार

वृत्तसंस्था/ स्वानसी, यूके

Advertisement

भारतीय फलंदाज शुभमन गिल इंग्लिश कौंटीमध्ये ग्लॅमर्गनतर्फे खेळणार आहे. या मोसमात अनेक भारतीय खेळाडू विविध कौंटीमध्ये खेळत असून चेतेश्वर पुजाराने त्यात आतापर्यंत जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.

अलीकडेच झालेल्या झिम्बाब्वे व विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत गिलने दोनदा मालिकावीरचा पुरस्कार मिळविला. त्याने आतापर्यंत भारतातर्फे 11 कसोटी व 9 वनडे सामने खेळले आहेत. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या सहा वनडे सामन्यात त्याने एक शतक व तीन अर्धशतके नोंदवली आहेत. याशिवाय तो भारतीय कसोटी संघातील नियमित सदस्यही आहे. व्हिसा मंजूर झाल्यानंतर तो ग्लॅमर्गनला उर्वरित कौंटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.