महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प फौंडेशनतर्फे ओलमणी हायस्कूलला क्रीडा साहित्य भेट

09:17 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलला क्रीडा साहित्याचा संच देण्यात आला. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशन कार्यरत आहे. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम अशी 32 गावे दत्तक घेतली आहेत. येथील ग्रामस्थांसाठी व शाळेसाठी विविध उपक्रम फौंडेशनतर्फे राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ओलमणी शाळेला क्रीडा साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवावे, या हेतूने हे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी लोककल्पचे संचालक किरण गावडे, स्वयंसेवक संतोष कदम, मुख्याध्यापक, ग्रा. पं. सदस्य आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article