महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रीनलँडच्या बर्फात मिळाला विशाल व्हायरस

06:53 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घाबरण्याऐवजी वैज्ञानिक मानत आहे गुडन्यूज

Advertisement

ग्रीनलँडच्या बर्फात विध्वंस घडवून आणणारे व्हायरस आहेत. यापैकी एक विशाल व्हायरसचा शोध घेण्यात आला आहे. बर्फ वितळण्यासोबत वैज्ञानिक निष्क्रीय पडलेल्या शेवाळाचे निरीक्षण करत आहेत. तेथे त्यांना अत्यंत अनपेक्षित गोष्ट हाती लागली आहे. आरहस विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या तज्ञांनी एक विशाल व्हायरस शोधला आहे.

Advertisement

संशोधक लॉरा पेरीनी यांच्यानुसार यात सामान्य व्हायरसच्या तुलनेत अत्यंत मोठा जीनोम अनुक्रम असतो. असा व्हायरस पहिल्यांदा 1981 मध्ये समुद्रात शोधण्यात आला होता. हे व्हायरस सर्वसाधारणपणे समुद्रात शेवाळाला संक्रमित करतात. परंतु पहिल्यांदाच अशाप्रकारच्या ठिकाणी विशाल व्हायरस शोधण्यात आला आहे. संशोधक याला सकारात्मक घटना मानत आहेत. विशाल व्हायरस कुठल्याही प्रकारच्या गुप्त अस्त्राच्या स्वरुपात कार्य करु शकतात आणि बर्फ वितळण्याचा वेग कमी करू शकतात असे त्यांचे मानणे आहे. याच्याशी निगडित अध्ययन मायक्रोबायोम नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

आम्ही व्हायरसविषयी फार काही जाणत नाही, परंतु शेवाळाच्या मदतीने बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. हा व्हायरस किती विशिष्ट आहे आणि किती कुशल ठरेल हे आम्ही अद्याप जाणत नाही. परंतु आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे. टीमने बर्फाच्या आच्छादनातून नमुने जमविले असून यात खोल बर्फाचे तुकडे, लाल आणि हिरवा बर्फ सामील होता. डीएनएच्या विश्लेषणानंतर संशोधकांना ज्ञात विशाल व्हायरसशी साधर्म्य दर्शविणारे जीनोम अनुक्रम आढळून आल्याची माहिती लॉरा यांनी दिली.

विशाल व्हायरस म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे व्हायरस हे बॅक्टेरियापेक्षा खूपच छोटे असतात. सायन्स डेलीसनुसार सामान्य विषाणूचा आकार 20-200 नॅनोमीटरपर्यंत असतो. तर एका सामान्य बॅक्टेरियाचा आकार 2-3 मायक्रोमीटर असतो. एक सामान्य व्हायरस बॅक्टेरियापेक्षा सुमारे एक हजारपट लहान असतो. परंतु विशाल व्हायरस 2.5 मायक्रोमीटरच्या आकारापर्यंत मोठे असू शकतात. विशाल व्हायरस हे बहुतांश बॅक्टेरियांपेक्षा मोठे असतात. परंतु केवळ डोळ्यांनी पाहता येतील इतपत त्यांचा आकार नसतो. विशाल व्हायरसचा शोध घेण्यासाठी उपकरणांची गरज भासते असे पेरीना यांनी सांगितले

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article