महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुलाम नबी आझाद लढविणार नाहीत निवडणूक

06:44 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनंतनाग मतदारसंघाच्या उमेदवारीपासून माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी केली आहे. यापूर्वी त्यांनी स्थापन केलेला पक्ष डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाने अनंतनाग-राजौरी मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. आझाद यांनी आता उमेदवारीपासून माघार घेतली आहे.

आझाद यांनी अनंतनाग येथील पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली आहे. आझाद यांच्याऐवजी त्यांच्या पक्षाने अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मोहम्मद सलीम पर्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

एका प्रचारसभेत बोलताना आझाद यांनी कथुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींचे समर्थन करणारे लालसिंह यांचा प्रचार केल्याबद्दल राहुल गांधी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने ज्याला चुकीचे मानले, त्याला राहुल गांधी आणि अब्दुल्लांनी डोक्यावर घेतले आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने खूपच खालची पातळी गाठली असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.

अनंतनाग-राजौरी मतदारसंघात थेट लढत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात होणार असल्याचे मानले जात आहे. भाजपने अद्याप येथील उमेदवार जाहीर केलेला नाही. काश्मीरमध्ये भाजपला उमेदवार जाहीर करण्याची गडबड नसल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनीच म्हटले आहे.

भाजपला काश्मीरमधील स्वत:च्या पराभवाची जाणीव असल्याने तो पक्ष निवडणूक लढणे टाळत आहे. भाजपने देशातील सांप्रदायिक सौहार्द संपविल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्ष भाजपला जम्मू-काश्मीरमधील धर्मनिरपेक्ष मते विभागण्यास मदत करत असल्याचा दावाही अब्दुल्ला यांनी केला आहे.

एकेकाळी काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे आझाद हे 2005-08 दरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. 26 ऑगस्ट 2022 रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarun
Next Article