महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेतील ‘घोस्ट टाउन’

07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एखाद्या गावावर शत्रू अचानक हल्ला करतात आणि पूर्ण गावाला उद्ध्वस्त करत असल्याचे चित्रपटांमध्ये पाहिले असेल. परंतु असे केवळ चित्रपटांमध्ये घडत नाही, तर प्रत्यक्षातही घडत आहे. जगात एक असे गाव आहे, जे कधी बागडणारे हेते, तेथे सोने-चांदीचे खनन केले जात होते, लोकसंख्याही हजारोंच्या संख्येत होती. परंतु अचानक येथून लोक निघून गेले आणि आता हे गाव निर्जन ठरले आहे. येथील रस्त्यांवर शुकशुकाट असतो. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात बोदी नावाचे एक छोटे गाव आहे. 1859 मध्ये हे एका कॅम्पप्रमाणे सुरू झाले होते, कारण सिएरा नवादाच्या पर्वतांच्या पूर्व क्षेत्रात सोने आढळले होते. 1876 मध्ये हे ठिकाण मोठ्या प्रमाणात सोने मिळाल्याने अधिकच चर्चेत आले. 1879 पर्यंत हे गाव एका मोठ्या वसाहतीत रुपांतर झाले, कारण येथील लोकसंख्या 5 हजारांहून 7 हजार झाली होती.

Advertisement

सोन्याच्या खाणीमुळे येथे अनेक मायनर यायचे, परंतु त्याचवेळी गुंड, माफियांची दहशत येथे फैलावू लागली होती. खाणीतील सोने संपू लागल्यावर लोकांनी हळूहळू येथून स्थलांतर केले. मायनर्सच्या स्ट्राइकमुळे हे गाव देखील कालौघात रिकामी होत गेले. 1910 पर्यंत लोकांची संख्या 700 हून कमी झाली आणि 1915 पर्यंत या गावाला घोस्ट टाउन घोषित करण्यात आले. 1940 पर्यंत येथे मोजके लोक राहत होते. परंतु 1962 मध्ये याला स्टेट पार्क घोषित करण्यात आले. येथे लोक आता फिरण्यासाठी येतात, छायाचित्रे काढतात आणि 150 वर्षांपूर्वी येथील आयुष्य कसे होते हे पाहतात. आजही येथे लाकडाने निर्मित सुमारे 200 घरे असून ती रिकामी अवस्थेत आहेत. या गावात जाण्यासाठी 600 रुपयांचे शुल्क असून मोठ्या संख्येत लोक येथे येत असतात. घरांचे डिझाइन अत्यंत जुने आहे.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article