Crop Damage: तासगाव तालुक्यात आढळली विषारी जातीची घोणस आळी, ग्रामस्थांत भिती
कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे
तासगाव : लुक्याच्या विषारी व मानवी शरीराला घातक असणाऱ्या घोणस अळी आढळून आल्याने शेतकरी व पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात झाडाझुडपात अनेक ठिकाणी घोणस आळी अनेक शेतकरी व पशुपालकांना आढळून आली आहे.
या घोणस अळीच्या दंशामुळे सूज येणे, ठणका घालणे, याबरोबरच उलटी होणे, असा त्रास होत असल्याने याबाबत भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यासमोर सातत्याने नवनवीन संकट येत असतात. कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे.
अशातच आता शेतकऱ्यांसमोर घोणस अळी नावाच्या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे.
या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकर्यांच्या पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या कीडी पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर, खरीपाच्या पिकात आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
खरीपासह रब्बीच्या विविध पिकांवर तिचा बावर आहे. हिरवा कलर व पिकाच्या पानामागे ती बसत असल्याने लक्षात येत नाही. सध्या पावसाचे व ढगाळ वातावरण असल्याने आळीसाठी व किटका साठी पोषक वातावरण आहे. घोणस आळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकामे करताना जनावरांसाठी वैरण आणताना काळजी घेण्याची गरज आहे.