महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जर्मनीचा थॉमस मुल्लेर निवृत्त

06:45 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जर्मनीचा अनुभवी आणि ज्येष्ठ फुटबॉलपटू थॉमस मुल्लेरने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2014 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या जर्मनीच्या फुटबॉल संघामध्ये थॉमस मुल्लेरचा समावेश होता.

Advertisement

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू टोनी व्रुसने फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या क्षेत्रातील निवृत्त होणारा जर्मनीच्या मुल्लेर हा दुसरा महत्वाचा फुटबॉलपटू आहे. जर्मनी संघातील मध्यफळी मुल्लेरने बरीच वर्षे सांभाळली होती. या संघातील तो एक आक्रमक फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात घरच्या मैदानावर जर्मनीला स्पेनकडून हार पत्करावी लागली. या पराभवानंतर मुल्लेरने आपला आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात स्पेनने जर्मनीचा 2-1 असा पराभव केला होता.

सोमवारी पत्रकार परिषदेत मुल्लेरने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मुल्लेरने आपल्या वैयक्तिक 131 सामन्यात जर्मनीचे प्रतिनिधीत्व करतानाच 45 गोल नोंदविले आहेत. 2010 मार्चमध्ये मुल्लेरने जर्मनी संघात पहिल्यांदा आपला प्रवेश केला. 2010 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मुल्लेरने 5 गोल नोंदविल्याने त्याला फिफाचा सर्वोत्तम युवा फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला. मुल्लेर गोल्डन बुटचा मानकरी ठरला. 2014 साली ब्राझिलमध्ये झालेल्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जंटिनाचा पराभव केला होता. या स्पर्धेत मुल्लेरने पाच गोल नोंदविले तसेच प्राथमिक फेरीमध्ये त्याने पोर्तुगाल विरुध्द हॅट्ट्रीक नोंदविली होती. अलिकडच्या कालावधीत मुल्लेरने जर्मनीकडून खेळताना 19 सामन्यात 10 गोल केले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article