For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिरागला अनुकूल ड्रॉ

06:42 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिरागला अनुकूल ड्रॉ
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे अव्वल बॅडमिंटन पटूंची जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना पुरूष दुहेरीचा ड्रॉ खूपच अनकुल ठरला आहे.

23 वर्षीय सात्विक आणि 27 वर्षीय चिराग यांनी थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत सुवर्ण पदक तसेच त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीला मानांकनांत तिसरे स्थान देण्यात आले आहे. या जोडीने या पूर्वी पुरूष दुहेरीच्या मानांकनांत अव्वलस्थान मिळविले होते. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या बॅडमिंटन प्रकारात सात्विक आणि चिराग यांच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.

Advertisement

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील ड्रॉनुसार सात्विक आणि चिराग यांचा क गटात समावेश आहे. या गटात भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या अलफियान आणि मोहम्मद रियान आर्देंतो कडवा प्रतिकार अपेक्षीत आहे. सात्विक आणि चिराग यांनी 2023 च्या आशियायी चॅम्पियनशीप स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तसेच या जोडीने फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या आणि थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये विजेतीपदे मिळविली. 2024 च्या हंगामात सात्विक आणि चिराग यांनी या शिवाय अन्य दोन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. क गटामध्ये जर्मनीच्या लेम्सफस आणि सिडेल त्याच प्रमाणे फ्रान्सच्या कोर्व्ही व लेबार यांचा समावेश आहे. पुरूषांच्या दुहेरी प्रकारात एकूण 17 जोड्यांचा समावेश राहिल.

Advertisement
Tags :

.