For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीची शेवटच्या क्षणी स्वित्झर्लंडशी बरोबरी

06:47 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीची शेवटच्या क्षणी स्वित्झर्लंडशी बरोबरी
Advertisement

वृत्तसंस्था/ फ्रँकफर्ट (जर्मनी)

Advertisement

युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. प्रभावी स्वित्झर्लंड संघाविऊद्ध जर्मनीला स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारावा लागतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी सर्वांनी गोल करण्यासाठी जोर लावला.

यात बचावपटू निको श्लोटरबेक, सेंटर-बॅक अँटोनियो ऊडिगर आणि निकलस फुलक्रग या साऱ्यांचा समावेश राहिला. स्टॉपेज टाइमच्या दोन मिनिटांत या जर्मन त्रिकुटाला तीन स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी रोखून आपली 1-0 अशी आघाडी सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला नाही. शेवटी फुलक्रगनेच ही शर्यत जिंकली. त्याने दुसरा बदली खेळाडू डेव्हिड राऊमने क्रॉस केलेला चेंडू स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमरच्या बाजूने जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात हाणला आणि सामना 1-1 असा संपला.

Advertisement

जर्मनीने रविवारच्या किकऑफपूर्वीच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता, परंतु स्वित्झर्लंडविरुद्धची अनिर्णीत परिस्थिती देखील त्यांना विजयासारखे वाटली आणि स्कॉटलंड व हंगेरीविऊद्धच्या प्रभावी विजयांनी मिळवून दिलेली गती त्यांनी कायम ठेवली. गुण वाटून घ्यावे लागल्याने जर्मनीने ‘अ’ गटात अव्वल स्थान आणि स्वित्झर्लंड दुसरे स्थान मिळवले आहे. हंगेरीने स्टुटगार्टमध्ये स्टॉपेज-टाइममधील गोलाच्या बळावर स्कॉटलंडला 1-0 ने पराभूत करून तिसरे स्थान मिळवले.

जर्मनी आता गट ‘क’मधील दुसऱ्या क्रमांकाविरुद्दच्या संघाविऊद्ध उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी शनिवारी डॉर्टमंडला जाईल. तो प्रतिस्पर्धी इंग्लंड, स्लोव्हेनिया, डेन्मार्क किंवा सर्बिया या चार संघांपैकी कोणताही एक असू शकतो. सदर संघ मंगळवारी ‘क’ गटातील त्यांची शेवटची फेरी खेळणार आहेत. स्वित्झर्लंड शनिवारी ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्धच्या सामन्याने उपउपांत्यपूर्व फेरीला प्रारंभ करेल. त्यांचा प्रतिस्पर्धी इटली किंवा क्रोएशिया असू शकतो.

Advertisement
Tags :

.