महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय हॉकी संघासमोर आज जर्मनीचे आव्हान

06:21 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

जोरदार कामगिरी करताना सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या मार्गावर असलेला भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज परिचित प्रतिस्पर्धी आणि विद्यमान विश्वविजेता जर्मनीचा मुकाबला करणार आहे. यावेळी  टोकियोतील खेळाडंत मिळविलेल्या कांस्यपदकाहून पुढे जाण्याच्या दृष्टीन त्यांचा प्रयत्न राहील. 1980 च्या मॉस्को गेम्समध्ये भारताने हॉकीतील त्यांच्या आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकांपैकी शेवटचे पदक जिंकले होते. पॅरिसमध्ये त्यांना इतिहास घडवण्याची उत्तम संधी आहे.

Advertisement

उपांत्य फेरीत विजयी झाल्यास भारताचे रौप्यपदक निश्चित होईल. यापूर्वी हॉकीत शेवटचे रौप्य भारताने 1960 च्या रोममधील खेळांत जिंकले होते. भारतीयांनी रविवारी उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनविऊद्ध 40 मिनिटे दहा खेळाडूंनिशी खेळावे लागूनही दमदार कामगिरी केलेली असल्याने त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आपली शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असून त्याने कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वोत्तम प्रदर्शन घडविलेले आहे. त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन प्रयत्न निष्फळ ठरविल्याने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

आज हरमनप्रीतसह संपूर्ण संघ श्रीजेशला निरोपाची संस्मरणीय भेट देण्यास इच्छुक असेल. ‘दि ग्रेट वॉल ऑफ इंडियन हॉकी’ असे टोपणनाव असलेला श्रीजेश आतापर्यंत अभूतपूर्व कामगिरी करत आला आहे. एका योद्ध्याप्रमाणे त्याने गोलरक्षण केलेले आहे. ब्रिटनविऊद्ध श्रीजेशने 10 मैदानी फटके नेत्रदीपकरीत्या अडविले. तसेच 10 पेनल्टी कॉर्नर निष्फळ ठरविले. असे असले, तरी भारतीयांसाठी आजचे आव्हान सोपे जाणार नाही. कारण मुख्य बचावपटू अमित रोहिदासला ब्रिटनविरुद्ध वादग्रस्त लाल कार्ड दाखविण्यात आल्याने उपांत्य सामन्यात निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध हॉकी इंडियाने दाद मागितली आहे.

रोहिदासच्या अनुपस्थितीमुळे पेनल्टी कॉर्नरच्या बाबतीत भारतासमोरचे पर्यायही कमी झाले आहे. कारण याबाबतीत हरमनप्रीतनंतर त्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी कर्णधारावर असेल. जागतिक क्रमवारी आणि अलीकडील कामगिरी पाहता भारत आणि चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेला जर्मनी यांच्यात फारसा फरक नाही. जागतिक क्रमवारीत जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ त्याखालोखाल आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाला 3-2 ने पराभूत करणारा जर्मनी हा भारतासाठी परिचित प्रतिस्पर्धी आहे. टोकियोमधील कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारताने त्यांच्यावरच 5-4 असा रोमहर्षक विजय नोंदवला होता. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सचा सामना स्पेनशी होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article