For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीला विक्रमी आठव्यांदा जेतेपद, भारताला कांस्यपदक

06:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीला विक्रमी आठव्यांदा जेतेपद  भारताला कांस्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

Advertisement

जर्मनीने अंतिम फेरीत दहाव्यांदा प्रवेश करण्याबरोबरच कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आपला आठवा किताब पटकावला. त्यांनी प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पेनचा पराभव करून चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात आपले विजेतेपद कायम राखले. ही 13 दिवसांची स्पर्धा बुधवारी एका रोमांचक अंतिम सामन्याने संपली, ज्याचा निर्णय शूटआऊटमध्ये झाला. जर्मनीने स्पेनविऊद्धचा अंतिम सामना पूर्ण वेळेत 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर आपला उदयोन्मुख खेळाडू जॅस्पर डिट्झरच्या गोलरक्षण कौशल्याच्या जोरावर शूटआऊटमध्ये विजय मिळवला. दोन्ही संघांचे लक्ष बचावावर अधिक होते, विशेषत: जर्मनीचे. त्यांनी 26 व्या मिनिटाला जस्टस वॉरवेगच्या फील्ड गोलमुळे आघाडी घेतली होती. परंतु मध्यांतरानंतर तीन मिनिटांनी स्पेनने जर्मन बचावफळी भेदली आणि निकोलस मुस्तारोसने आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

दोन्ही संघांना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. शूटआऊटचा सामनाही शेवटपर्यंत रंगला आणि त्याचा निर्णय 10 व्या प्रयत्नात झाला. जर्मनीची सुऊवात खराब झाली, जोनास फॉन गेर्सम आणि वॉरवेग हे गोलरक्षक दिएगो पालोमेरोच्या बचावाला भेदण्यात अपयशी ठरले. स्पेनचा पेरे अमाटही जर्मन गोलरक्षक डिट्झरविऊद्ध आपल्या संघाचा पहिला प्रयत्न यशस्वी करू शकला नाही, परंतु पाब्लो रोमनने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. बेनेडिक्ट गेयरने तिसरा प्रयत्न यशस्वी करून जर्मनीला बरोबरी साधून दिली आणि स्पेनच्या अॅलेक्स बोझालने संधी गमावली. पण जर्मनीने दबावाला चांगल्या प्रकारे हाताळले आणि अॅलेक फॉन श्वेरिन व कर्णधार बेन हॅसबॅक यांच्यामुळे शेवटचे दोन प्रयत्नही यशस्वी केले. जरी जुआन प्राडोच्या गोलमुळे स्पेनने सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले, तरी आंद्रेस मेडिनाच्या निर्णायक शेवटच्या प्रयत्नाला डिट्झरने हाणून पाडले, ज्यामुळे मैदानात आणि जर्मन गोटात जल्लोष उसळला.

Advertisement

अर्जेंटिनाला 4-2 ने नमवून भारताकडून कांस्यपदकाची कमाई

भारताने कनिष्ठ विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करत दोन गोलांची पिछाडी भरून काढत अर्जेंटिनाला 4-2 ने पराभूत करून कांस्यपदक पटकावले. 2016 मध्ये लखनौमध्ये विजेतेपद जिंकलेल्या भारताला गेल्या दोन प्रसंगी पदकांच्या मानकऱ्यांमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. त्यांना 2017 मध्ये भुवनेश्वरमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि दोन वर्षांनंतर क्वालालंपूरमध्येही अशीच परिस्थिती होती. भारताच्या अंकित पाल (49 वे मिनिट), मनमीत सिंग (52 वे मिनिट) आणि अनमोल एक्का (58 वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर शारदानंद तिवारीने 57 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. अर्जेंटिनाने विशेषत: पहिल्या दोन सत्रांमध्ये चांगला खेळ केला आणि निकोलस रॉड्रिग्ज (3 रे मिनिट) आणि सांतियागो फर्नांडेझ (44 वे मिनिट) यांच्या गोलांमुळे आघाडी घेतली.

Advertisement
Tags :

.