अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या टिप्पणीला भारत सरकारचे प्रत्युत्तर; तीव्र शब्दात निषेध
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता जर्मनीकडूनही अशाच प्रकारचा टिप्पणी केल्यानंतर केंद्रसरकारने याचा निषेध करत हा भारत सरकारच्या अंतर्गत विषयातील हस्तक्षेप असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं सांगून याचा निषेध भारत सरकारने केला आहे.
दिल्लीमध्ये मद्य विधेयकामुळे मद्य घोटाळा झाला असून त्याचा मुख्य आरोप अरविंद केजरीवाल आहेत असा आरोप करून ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या अटकेने राज्यभरात आपने निदर्शने केली.
यानंतर जर्मनी देशाच्या प्रवक्त्याने या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, "भारत हा लोकशाही देश आहे हे आम्ही जाणतो. त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे या अटकेच्या प्रकरणातही लागू होतील. अशा आरोपांना सामोरे जावे लागलेल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणेच केजरीवाल यांना न्याय्य आणि अधिकार आहेत. निर्दोषपणाचा अंदाज हा कायद्याच्या नियमाचा एक केंद्रीय घटक असून तो लागू करणे आवश्यक आहे, " असे जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
यावर प्रत्युत्तर देताना भारत सरकारने जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहूव आपला निषेध नोंदवला या पत्रात म्हटले आहे कि, "जर्मनीने केलेली टिप्पणी ही भारताच्या अंतर्गत विषयामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. भारताची न्यायव्य़वस्था ही मजबूत असून त्या या व्यवस्थेमध्ये बाहेरील हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. जर्मनीच्या प्रवक्त्याने केलेल्या या टिप्पणीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो." असेही भारत सरकारने म्हटलं आहे.