महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जॉर्जियाचा पोर्तुगालला 2-0 ने धक्का, बाद फेरीसाठी पात्र

06:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /गेल्सेनकिर्चेन (जर्मनी)

Advertisement

जॉर्जियाने युरोपियन चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या धक्क्यांपैकी एकाची नोंद करताना पोर्तुगालला 2-0 ने पराभूत केले आणि अंतिम 16 संघांमध्ये प्रवेश केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालसाठी त्यामुळे सदर रात्र निराशाजनक राहिली. युरो, 2024 मध्ये बाद फेरी गाठण्यासाठी जॉर्जियन्सना विजयाची गरज होती आणि केवळ 93 सेकंदांनंतर त्यांचा पहिले गोल झाला. जॉर्जेस मिकौताडझेने खराब पास रोखला आणि गोल करण्यासाठी क्वारात्स्केलियाला चेंडू पुरविला. त्यानेही ही संधी सोडली नाही. आंतोनिया सिल्वाने पहिल्या गोलआधी चेंडू दिला आणि दुसऱ्या गोलसाठी पेनल्टी दिली. त्यावेळी त्याने पेनल्टी क्षेत्रात लुका लोचोशविलीला अडविले. मिकौताडझेने 57 व्या मिनिटाला ही स्पॉट किक हाणून पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कॉस्ताला चकविले.

Advertisement

जॉर्जियाने या प्रमुख स्पर्धेत पदार्पणातच तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांपैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रगती केली आहे. पोर्तुगालने पहिले दोन सामने जिंकून गट ‘एफ’मधून आधीच पात्रता मिळवली होती. जॉर्जियन्सचा पुढील सामना रविवारी कोलोनमध्ये स्पेनशी होईल, तर सोमवारी फ्रँकफर्टमध्ये पोर्तुगालचा सामना स्लोव्हेनियाशी होईल. स्लोव्हेनियाने मार्चमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात पोर्तुगालला 2-0 ने पराभूत केले होते. दरम्यान, युरो 2024 मध्ये रोनाल्डो अजूनही गोलविना राहिला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पेनल्टी मिळायला हवी होती अशी त्याची भावना होती आणि 66 व्या त्याला बदलण्यात आल्यावर त्याने पाण्याच्या बाटली लाथ मारून बाजूला टाकली. रोनाल्डोचे पेनल्टीचे अपील फेटाळल्यानंतर त्याने दर्शविलेल्या निषेधाबद्दल त्याला पिवळे कार्ड देण्यात आले. दरम्यान, तुर्कस्तानने अन्य गटातील एका लढतीत झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. तुर्कस्तान त्यामुळे पुढे गेले असून झेक प्रजासत्ताक बाहेर पडले आहे. जॉर्जियाच्या विजयाने हंगेरीचीही स्पर्धेबाहेर रवानगी झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article