महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चर्चांचा सर्वसाधारण सूर

06:22 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात...

Advertisement

? मागच्या दोन निवडणुकांसारखी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही. ही निवडणूक ‘लाटविहीन’ आहे. बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्देच प्रभावी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक एकांगी होणार नाही. मतदार पर्यायांचा विचार करताना दिसून येत आहेत.

Advertisement

? या निवडणुकीत राष्ट्रीय नव्हे, तर स्थानिक मुद्दे प्रभावी ठरताना दिसतात. बहुसंख्य मतदार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार नाहीत. उमेदवार आणि त्यांची कार्यक्षमताही महत्वाची ठरणार आहे. आतार्यंतच्या मतदानावरुन तसे संकेत पहावयास मिळत आहेत.

? ही निवडणूक धर्माच्या नव्हे, तर जातीच्या आधारावर होत आहे. मतदारांचे ध्रूवीकरण तशा प्रकारे होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये जसे धर्माच्या आधारे मतदान झाले, तसे यंदा होताना दिसत नाही. म्हणून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याची आघाडी चिंतेत पडलेली दिसत आहे.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीविरोधी आहेत. त्यांनी अनेक लोकशाही संस्थांचे खच्चीकरण केले आहे. ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांना त्यांनी आपल्या कह्यात घेतले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी ‘गडबड’ केल्याशिवाय जिंकणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ...

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा नेता विरोधी पक्षांकडे नाही विरोधी पक्षांचे नेते त्यांच्या राज्यांच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत. ही लोकसभेची निवडणूक आहे. ती समर्थ नेत्याच्या चेहऱ्यावरच होत असते. लोकांना राष्ट्रीय निवडणूक आणि स्थानिक निवडणुका यांच्यातील अंतर समजते.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या काळात देशात मोठ्या सुधारणा झाल्या. पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात आजवर झाली नव्हती एवढी कामे झाली. गरीबांसाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या. त्यांचा गरीबांना लाभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच या निवडणुकीवर प्रभाव दिसतो.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात लोकशाही बळकट झाली आहे. लोकशाहीला धोका आणिबाणीच्या काळात झाला होता. कोणाच्याही कोणत्याही स्वातंत्र्यावर बंधने आज नाहीत. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्था त्यांचे काम करीत आहेत. ईव्हीएम विश्वासार्ह आहेत, हे न्यायालयानेच स्पष्ट केले आहे.

? विरोधी पक्षांची आघाडी विस्कळीत झाली आहे. अनेक पक्ष आणि नेते या आघाडीतून बाहेर पडले आहेत. ते भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाले आहेत. त्यातून वारे कोणत्या दिशेने वहात आहे, हे स्पष्टपणे कळून येते. मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच होत आहे. त्यामुळे वातावरण त्यांना अनुकूल आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article